ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २४ - अठ्ठावीस देशांच्या युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय ब्रिटनने घेतल्यामुळे तेथे राहणा:या सुमारे साठ हजार गोमंतकीयांना मोठा धक्का बसला आहे. युरोपीय संघाच्या स्थापनेनंतर पोतुर्गीजमार्गे ब्रिटनमध्ये जाणा:यांची संख्या खूप वाढलेली आहे. गोवा सोडून जाण्याचा हा प्रश्न गोव्यातही राजकीय आणि नाजूक बनलेला आहे. प्रमुख सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह सर्वच राजकीय पक्षांनी अशा नागरिकांच्या दुहेरी नागरिकत्वाच्या मागणीचा वेळोवेळी पुरस्कारच केलेला आहे.ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा निर्णय जनमताद्वारे घेतल्यानंतर गोव्यात शुक्रवारी पहिली प्रतिक्रीया आली ती ब्रिटनमध्ये स्थायिक गोमंतकीयांचे आता काय होणार अशी....
आणखी बातम्या :
गोव्यात 2017 मध्ये होणा:या विधानसभा निवडणुकीतही हा राजकीय मुद्दा ठरण्याची श्क्यता आहे. त्यामुळे गोव्यातील बहूतेक पक्ष ब्रिटनमधील गोमंतकीयांना दिलासा देण्याच्याच प्रयत्नात अहेत.
गोव्यात गोवा फॉरवर्ड पक्ष हा सर्वात तरूण पक्ष आहे. या पक्षातर्फे शुक्रवारी पहिली जाहीर प्रतिक्रीया दिली ती अशी की आम्ही तुमच्याबरोबर आहोत. इतकेच नव्हे तर गोवा सरकारने विनाविलंब टास्क फोर्स स्थापन करावा, अशी मागणीही या पक्षाने केलेली आहे. टास्क फोर्सद्वारे ब्रिटनस्थित गोमंतकीयांना दिलासा द्यावा, असा या पक्षाचा आग्रह आहे. गोवा फॉरवर्ड पक्ष ब्रिटनस्थित गोमंतकीय आणि त्यांचे गोव्यातील नातेवाईक यांच्यासाठी सल्लामसलत आणि पुनर्वसन केंद्र स्थापन करणार आहे.
(विशेष प्रतिनिधी)