संदीप आडनाईकपणजी : गोव्यातील ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची वाटचाल समारोपाच्या दिशेने सुरू आहे. शेवटच्या टप्प्यात का होईना, पण काही नामवंत कलावंतांनी हजेरी लावल्यामुळे थोडीशी तरी जान इफ्फीमध्ये आली आहे. उद्घाटनाच्या दिवशी अभिनेता शाहरुख खान, शाहीद कपूर यांच्यामुळे यंदाच्या इफ्फीत आणखीही काही नामवंत कलावंत हजेरी लावतील अशी आशा होती, परंतु समारोपाला दोन दिवस बाकी असतानाही म्हणावे तसे कलावंत इफ्फीत दाखल झालेले नाहीत.श्रीदेवी, सतिश कौशिक, नाना पाटेकर, मनोज जोशी, पद्मिनी कोल्हापूरे, वर्षा उसगांवकर, दिप्ती नवल यासारख्या जुन्या पिढीतील काही कलावंतांनी येथे हजेरी लावली. दरवर्षी हजेरी लावणारा जग्गूदादाही अद्यापही आलेला नाही. यामुळे इफ्फीत आलेल्या जगभरातील चित्रपट रसिकांना यंदाचा महोत्सव सुना सुना जाणवत आहे.मात्र सुशांतसिंग रजपूत, श्रध्दा कपूर, सोनाली कुलकर्णी, भूमी पेडणेकर, मिथिला पालकर या नव्या पिढीतील कलावंतासोबतच एफटीआयआयचे संचालक आणि अभिनेते अनुपम खेर, सचिन खेडेकर, ऋषि कपूर यांच्या उपस्थितीमुळे इफ्फीच्या अंतिम टप्प्यातील प्रवासात जान आली आहे.हिंदीपेक्षा मराठी अभिनेत्यांनीच मारली बाजीया महोत्सवात जगभरातील चित्रपट रसिकांना भेटण्यासाठी आलेल्या कलावंतांमध्ये हिंदीपेक्षा मराठीतील कलावंतांनीच जास्त काळ इफ्फीत हजेरी लावून बाजी मारली आहे. प्रसाद ओक, नागेश भोसले, सचिन खेडेकर, पद्मिनी कोल्हापूरे, वर्षा उसगावंकर, भूमी पेडणेकर, मिथिला पालकर, नाना पाटेकर, मनोज जोशी या कलावंतांनी इफ्फीत हजेरी लावून चाहत्यांना खूष केले. या कलाकारांनी जागतिक सिनेमाचाही आस्वाद घेतला.
नामवंत कलावंतांमुळे इफ्फीमध्ये आली जान, सुशांतसिंग रजपूत, अनुपम खेर, शेखर कपूर, भूमी पेडणेकर, सचिन खेडेकर यांची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 12:20 PM