काशिराम म्हांबरे,म्हापसा : बुधवारी तिळारी धरणाच्या कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी शिवोली मतदार संघातील सडये पंचायत क्षेत्रातील घरात शिरण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे परिसरात पाऊस नसताना पुरसदृष्य सारखी स्थिती या भागात निर्माण झाली होती.
परिसरातील कालव्यांची साफ सफाई करण्यात आली नसल्याचे तिळारीतून सोडण्यात आलेले पाणी कालव्यात भरून राहून नंतर ते रस्त्यावरून वाहण्यास आरंभ झाल्याची माहिती स्थानीकांकडून देण्यात आली. गुरुवारी सकाळपासून हा प्रकार सुरु झाला असल्याचे स्थानीकांनी सांगितले. कालव्याची दुरुस्तीवर तसेच सडये भागातील गटारांची दुरुस्ती तसेच देखभाल करावी अशी वारंवार विनंती करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने हा प्रकार घडल्याचाही आरोप करण्यात आला.
दीपा वेर्णेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार कालव्याच्या साफ सफाईवर दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी रस्त्यावर शिरले. रस्त्याला लागून असलेल्या गटारांची साफ सफाई करण्यात आली नसल्याने त्यातून तिळारीचे पाणी भरून ते रस्त्यावरून वाहू लागल्याची माहिती दिली. बºयाच लोकांच्या घरात पाणी शिरल्याचे वेर्णेकर यांनी सांगितले. आपण स्वताही काही कामगार आणून त्यांच्याकडून साफ सफाई करुन घेतली असल्याचे त्या म्हणाल्या.