वास्को: साकवाळ, एम इ एस कॉलेज जवळील एका बंगल्यात चोरीच्या उद्देशाने आलेल्या तिघा चोरट्यांना पोलीसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर एका चोरट्यांने गोळी झाडली. चोरट्यांने झाडलेली गोळी जमनिवर आपटून एका पोलीसाच्या (होमगार्ड) गुडघ्याला लागल्याने त्याला कीरकोळ जखम होऊन सुदैवाने तो सुखरूप बचावला. बंगल्यात चोरीसाठी आलेल्या चोरट्यांनी गोळी झाडून पळ काढल्यानंतर पोलीसांनी त्यांना पकडण्यासाठी त्वरित सर्व ठीकाणी नाकाबंदी लावली. दुचाकीवरून पळालेल्या तिघा चोरट्यांना रस्त्यावर पोलीसांची नाकाबंदी दिसून येताच त्यांनी त्यांच्याशी असलेली दुचाकी रस्त्यावरच टाकून पोबारा काढला असून पोलीसांनी ती दुचाकी जप्त केली आहे.
पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिलेल्या माहीतीनुसार रविवारी मध्यरात्रीनंतर २ च्या सुमारास ती घटना घडली. साकवाळ, एम इ एस कॉलेज जवळ मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून तेथे अनेकांचे बंगले आहेत. त्याच परिसरात डॉ. आमोणकर यांचा बंगला असून त्यांचा परिवार गोव्याबाहेर असल्याने त्यांचा बंगला काही काळापासून बंद आहे. रात्री २ वाजता तीन चोरटे डॉ. आमोणकर यांच्या बंगल्यात घुसून चोरी करण्यासाठी बंगल्याचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे एका शेजाºयाला दिसून येताच त्यांनी त्वरित पोलीसांना माहीती दिली.
तीन चोर साकवाळ येथील बंगल्यात चोरीचा प्रयत्न करत असल्याची माहीती वास्को पोलीस स्थानकावरील रात्री ड्युटीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील नाईक यांना मिळाली. त्यांनी त्वरित इतर पोलीस शिपायाबरोबर घटनास्थळी धाव घेतली. डॉ. आमोणकर यांच्या बंगल्यात घुसून चोरी करण्यासाठी दोघे चोर आत दरवाजा फोडण्याच्या प्रयत्नात होते तर एक चोरटा बाहेरील हालचालीवर नजर ठेवण्यासाठी बंगल्याबाहेर उभा होता. अचानक पोलीसांचे वाहन तेथे पोचल्याचे बाहेर असलेल्या चोरट्याला दिसून येताच त्यांनी आपल्या इतर दोन चोरट्या साथिदारांना माहीती दिली.
पोलीस पथक घटनास्थळावर पोचल्याचे दरवाजा फोडण्याच्या प्रयत्ना असलेल्या चोरट्यांना कळताच त्यांनी बंगल्याच्या कुंपणावरून बाहेर उडी मारून ते दुचाकीने पळण्याचा प्रयत्न करत होते. चोरटे दुचाकीने पळण्याचा प्रयत्न करत असल्याचे तेथे पोचलेल्या पोलीसांना दिसून येताच त्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. दुचाकीने पळण्याच्या प्रयत्ना असलेल्या चोरट्यांना पोलीस त्यांना पकडण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येताच एका चोरट्यांने पोलीसांवर पिस्तूलाने गोळी झाडली. सुदैवाने झाडलेली ती गोळी थेट कोणालाच न लागता प्रथम रस्त्यावर आपटल्याची माहीती पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिली. गोळी रस्त्यावर आपटून परत येऊन तिचा स्पर्श एका पोलीसाच्या (होमगार्ड) गुडघ्याला झाल्याने त्याला कीरकोळ जखम होऊन तो सुखरुप बचावल्याची माहीती उपअधीक्षक शेख यांनी दिली. चोरट्यांनी पोलीसांवर गोळी झाडल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी असलेल्या दुचाकीवरून तेथून पोबारा काढला. बंगल्यात चोरीसाठी आलेल्या चोरट्यांनी पोलीसांवर गोळी झाडून पळ काढल्याचे घटनास्थळावर असलेल्या पोलीसांना समजताच त्यांनी त्वरित इतर पोलीसांना त्याबाबत माहीती दिली. त्या घटनेची माहीती मिळताच रात्री गस्तीवर असलेल्या पोलीसांनी चोरट्यांना गजाआड करण्यासाठी त्वरित विविध ठीकाणी नाकाबंदी लावली.
दुचाकीवरून पळालेल्या चोरट्यांना घटनास्थळावरून सुमारे दोन कीलोमीटर अंतरावर पोलीसांची नाकाबंदी असल्याचे दिसताच त्यांनी त्यांच्याशी असलेली दुचाकी रस्त्यावरच टाकून त्यांनी तेथे असलेल्या झुडपी भागातून पळ काढली. ते तिघे चोरटे चोरीसाठी घेऊन आलेली दुचाकी पोलीसांनी जप्त केली असून त्या चोरट्यांना गजाआड करण्यासाठी सर्व मार्गाने त्यांचा शोध चालू असल्याची माहीती उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिली. चोरट्यांना साकवाळ एम इ एस कॉलेज जवळील डॉ. आमोणकर यांच्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप फोडण्यात यश आले होते, मात्र वेळीच पोलीस पोचल्याने तिघा चोरट्यांचा चोरीचा बेत फसला. पोलीसांना घटनास्थळावर कुºहाड, स्पॅनर, स्क्रु ड्रायव्हर आणि फोडलेली कुलूपे सापडल्याची माहीती सूत्रांकडून प्राप्त झाली.
सोमवारी पहाटेपासूनच पोलीसांची सर्व यंत्रणे त्या चोरट्यांना गजाआड करण्यासाठी त्यांचा सर्व मार्गाने शोध घेत असल्याचे दिसून आले. वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक डायगो ग्राशियस आणि पोलीस पथकाने त्वरित घटनास्थळी दाखल होऊन त्या घटनेचा पंचनामा केला. तसेच पोलीसांनी घटनास्थळावर श्वान पथक आणि ठसे तज्ञांना बोलवून तेथे असलेले पुरावे जमा करण्याबरोबरच चोरट्यांना गजाआड करण्याकरिता त्यांची काही मदत घेण्याचा प्रयत्न केला. वेर्णा पोलीस अधिक तपास करित आहेत.