लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : पणजीतल्या ईडीसी-पाटो येथील सेंट्रल लायब्ररीच्या शेजारी गेरा कंपनीच्या बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पाच्या मातीत के्रन खचल्याने त्यात अडकून पडलेल्या क्रेन आॅपरेटरचा मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घडली.दोन महिन्यांपूर्वी याच कामामुळे सेंट्रल लायब्ररीच्या संरक्षक भिंतीला तडे गेले होते. गेरा कंपनीचे सरव्यवस्थापक द्वारका राव यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. मृत्युमुखी पडलेला आॅपरेटर कंत्राटदारासोबत कामाला होता. त्याच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी त्यांची होती. घटनेनंतर कंपनीच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. घटनेची चौकशी होत आहे. राकेशकुमार यादव असे मृत आॅपरेटरचे नाव असून अग्निशामक दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, कंत्राटदार कंपनी अमर फाउंडेशनचे पर्यवेक्षक योगेशकुमार त्रापासिया यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे.
क्रेनमध्ये अडकून आॅपरेटरचा मृत्यू
By admin | Published: May 19, 2017 2:48 AM