पणजी: इफ्फी काळात विद्युतीकरणासाठी पणजीतील झाडांना खिळे ठोकून त्यांची हानी केली आहे. यामुळे झाडांचे नुकसान होण्याबरोबरच पर्यावरणासही धोकादायक असल्याची चिंता टुगेदार फॉर पणजी असोसिएशनने व्यक्त केली आहे.
याप्रकरणी टुगेदार फॉर पणजी असोसिएशन ने पणजी मनपा , वन खात्याच्या प्रधान वनपाल तसेच पणजी आमदारांकडे तक्रार केली आहे. झाडांची जी हानी झाली आहे, याची दखल घ्यावी. तसेच भविष्यात असे प्रकार होऊ नये याची काळजी घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पणजीत २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान इफ्फीचे आयाेजन झाले. यानिमित शहरात विद्युतीकरण करण्यात आले. मात्र त्यासाठी लाईट तसेच केबल्स लावण्यासाठी बरीच वर्ष जुन्या झाडांना खिळे ठोकले. झाडांवर विद्युतीकरण करणे चुकीचे नाही. मात्र त्यासाठी खिळे वापरणे चुकीचे आहे. झाडांचे तसेच एकूणच पर्यावरणाची हानी झाल्याचे टुगेदार फॉर पणजी असोसिएशन ने नमूद केले आहे.