पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: पणजीतील आठ किलोमीटरचे रस्ते स्मार्ट सिटी योजनेखाली स्मार्ट बनणार आहेत. इफ्फी आयोजन स्थळ परिसरातील रस्त्यांचे काम इफ्फी पूर्वी पूर्ण केले जाईल अशी माहिती अधिकारी संजीत रॉड्रिग्स यांनी दिली.
पणजीतील स्मार्ट सिटी अंतर्गत सध्या रस्त्यांचे काम सुरु आहे. या कामांचा आढावा घेण्यासाठी रॉड्रिग्स यांनी रस्त्यांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत स्मार्ट सिटीचे कंत्राटदार उपस्थित हाेते. यावेळी त्यांनी इफ्फी पूर्वी इफ्फी आयोजन स्थळ परिसरातील रस्त्यांचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
रॉड्रिग्स म्हणाले, की स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीतील रस्त्यांचे काम सुरु आहे. सदर काम ठरावीक दिवसांत पूर्ण काम करण्यावर भर दिला जात आहे. एकूण आठ किलो मीटर रस्त्यांचे स्मार्ट सिटी अंतर्गत काम सुरु आहे. त्यापैकी विशाल मेगा मार्ट परिसरातील रस्ता हा इफ्फी आयोजन स्थळ परिसरातील आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम इफ्फी सुरु होण्यापूर्वी पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. त्यादिशेने कंत्राटदाराला निर्देश दिले आहे. तर इफ्फी काळातही उर्वरीत रस्त्यांचे सुरुच राहिल असे त्यांनी सांगितले.