मडगाव: नव्या वर्षाचा जल्लोश दक्षिण गोव्यात कुठल्याही दुर्घटनेशिवाय पार पडला असला तरी बोगमाळो-वास्को येथे एका 29 वर्षीय बंगळुरुच्या आयटी व्यावसायिकाला बुडून मृत्यू येण्याची घटना 31 डिसेंबरच्या दुपारी घडली. रविकुमार धनंजय पुजारी असे त्या युवकाचे नाव असून बंगळुरु येथील युनिसीस इंडिया प्रा. लि. या कंपनीत तो कामाला होता.
दक्षिण गोवा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणो, रविकुमार व त्याचे चार मित्र न्यू ईयर साजरे करण्यासाठी वास्को येथे आले होते. सोमवारी दुपारी ते पाचही मित्र बोगमाळो येथील समुद्रात उतरले होते. दुपारी 12.30 च्या सुमारास एका लाटेने रविकुमार याला खेचून आत नेले. त्याच्या मित्रंनी स्थानिकांच्या सहाय्याने त्याला पाण्यातून वर काढून किना:यावर आणून चिखली येथील इस्पितळात तातडीने हलविले. मात्र तिथे त्याला मृत जाहीर करण्यात आले.
ही एक घटना वगळता यंदाच्या थर्टीफस्ट नाईटला कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही अशी माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली. सोमवारी दक्षिण गोव्यातील किनारपट्टी भागात पर्यटकांनी गर्दी केली असली तरी चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही असे गावस यांनी सांगितले.