शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

माजी मंत्री रमेश तवडकर यांची भाजपात घरवापसी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 7:03 PM

माजी क्रीडामंत्री आणि काणकोणचे माजी आमदार रमेश तवडकर यांनी सोमवारी पुन्हा भाजपात प्रवेश केला.

मडगाव - माजी क्रीडामंत्री आणि काणकोणचे माजी आमदार रमेश तवडकर यांनी सोमवारी पुन्हा भाजपात प्रवेश केला. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काणकोण मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी नाकारल्याने बंडखोरी करुन अपक्ष निवडणूक लढविलेल्या तवडकर यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घरवापसी झाली आहे.राज्यसभा खासदार आणि भाजपाचे गोवा प्रदेशाध्यक्ष विनय तेंडूलकर यांनी मडगावात झालेल्या एका सोहळ्यात त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या मीनाक्षी लेखी, दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर, तसेच अन्य भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.2017 च्या निवडणुकीत पक्षाने काही चुकीचे निर्णय घेतल्यामुळेच आपल्याला  बंडखोरी करावी लागली हे यावेळी तवडकरांनी मान्य केले. तवडकर हे गोव्यातील एसटी नेते असून विधानसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना उमेदवारी नाकारल्यावर हा समाज भाजपापासून दूर गेल्याने काणकोणसह किमान तीन ठिकाणी भाजपाला पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे गोव्यात हा पक्ष अल्पमतात आला होता. यावेळीही तवडकर यांनी सुरुवातीला आपण दक्षिण गोव्यातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असे जाहीर करुन दक्षिण गोव्यातील एसटी बहुल भाग पिंजून काढला होता. या भागातून त्यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपाच्या पायाखालची वाळू सरकू लागली होती. त्याचमुळे नव्यानेच गोव्याचे महामंत्री म्हणून पक्षाचा ताबा घेतलेले सतीश धोंड यांच्यावर तवडकर यांचे मन वळविण्याची जबाबदारी दिली होती. धोंड यांच्या शिष्टाईमुळेच तवडकर पुन्हा भाजपात आले असून, ते भाजपाचे दक्षिण गोव्यातील लोकसभा उमेदवारही असू शकतात असे संकेत मिळाले आहेत. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा