पणजी : गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीची परीक्षा २ एप्रिल रोजी सुरु होऊन २३ एप्रिलपर्यंत चालेल. त्याआधी बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारी रोजी सुरू होऊन २६ मार्चपर्यंत चालेल.मंगळवार २ एप्रिल रोजी सकाळी ९.३0 ते दुपारी १२ या वेळेत प्रथम भाषा इंग्रजी, मराठी, ऊर्दू, ३ एप्रिल-सकाळी ९.३0 ते ११.३0 फ्लोरिकल्चर (सीडब्लूएसएन), ४ एप्रिल- सकाळी ९.३0 ते ११ सोशल सायन्स पेपर-१, ८ एप्रिल-सकाळी ९.३0 गणित (मॅथेमेटिक्स), ९ एप्रिल - सकाळी ९.३0 व्यावसायिकपूर्व विषय, १0 एप्रिल -सकाळी ९.३0 व्दितीय भाषा हिंदी, फ्रेंच, १२ एप्रिल- सकाळी ९.३0 सायन्स (विज्ञान), १३ एप्रिल- सकाळी ९.३0 तृतीय भाषा, १५ एप्रिल- सकाळी ९.३0 सोशल सायन्स पेपर २. २३ एप्रिलपर्यंत व्यावसायिकबारावीचे वेळापत्रकइयत्ता बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून पहिल्या दिवशी सकाळी १0 ते दु. १२.३0 अकाऊंटसी, फिजिक्स, इतिहास, १ मार्च- सकाळी १0 ते १ इंग्रजी, मराठी ६ मार्च-सकाळी १0 ते १२.३0 केमिस्ट्री, बिझनेस स्टडी, ८ मार्च-सकाळी १0 ते १२.३0 इकोनोमिक्स, ११ मार्च- सकाळी १0 ते १२.३0 - जीवशास्र (बायोलॉजी), भूगर्भशास्र (जिओलॉजी), १३ मार्च-सकाळी १0 ते १२.३0 गणित, पॉलिटिकल सायन्स, १५ मार्च-सकाळी १0 ते १२.३0 सायकॉलॉजी, कूकरी, १६ मार्च-सकाळी १0 ते १२.३0 हिंदी व्दितीय भाषा, पोर्तुगीज १८ मार्च-सकाळी १0 ते १२.३0 बँकिंग, (लॉजिक, कम्प्युटर सायन्स, को आपॅरेशन), १९ मार्च-इंग्रजी व्दितीय भाषा, कोकणी, ऊर्दू, संस्कृत, पेंटिंग, २0 मार्च-सकाळी १0 ते ११.३0 ऑटोमोबाइल, आयटी, हेल्थ, रीटेल, ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम, ब्युटी अॅण्ड वेलनेस, अॅपरेल, कन्स्ट्रक्शन, अॅग्रीकल्चर, फिजिकल एज्युकेशन, मिडिया अॅण्ड एंटरटेन्मेंट, बँकिं ग अॅण्ड इन्शुरन्स, टेलिकम्युनिकेशन्स व लॉजिस्टिक (व्यावसायिक विभाग), २२ मार्च- सकाळी १0 ते १२.३0 सेक्रेटरियल प्रॅक्टिस, २३ मार्च- सकाळी १0 ते १२.३0 -भूगोल(जिओग्राफी), २५ मार्च- सकाळी १0 ते १२.३0 सोशिओलॉजी, २६ मार्च-सकाळी १0 ते १२.३0 मराठी व्दितीय भाषा, फ्रेंच.व्यावसायिक अभ्यासक्रम, एनएसक्युएफ तसेच सीडब्ल्युएसएन अभ्यासक्रमांच्या परीक्षांचेही वेळापत्रक जाहीर केलेले आहे.
गोव्यात बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारीपासून, दहावीची २ एप्रिलपासून
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 8:09 PM