पणजी : राज्यात रविवारी ‘नीट’ परीक्षा पार पडली. पणजी, मडगाव, फोंडा व केपे अशा चार केंद्रांवर ही परीक्षा झाली. या केंद्रांवर सकाळपासूनच पालक व विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी ही परीक्षा होते. देशभरातून यंदा २२ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि वनस्पतीशास्त्र असे चार विषय या परीक्षेत होते. सदर परीक्षा ही दोन विभागांत घेण्यात आली. विभाग अमध्ये ३५ प्रश्न, तर विभाग बमध्ये १५ प्रश्न होते. त्यापैकी केवळ १० प्रश्नांना विद्यार्थ्यांनी उत्तरे देणे अपेक्षित आहे. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी ४ गुण, तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल. प्रयत्न न केलेल्या प्रश्नांसाठी शून्य गुण दिले जातील.