पणजी - गोव्याच्या राज्य अर्थसंकल्पात अबकारी करामध्ये केलेली लक्षणीय वाढ पर्यटन व्यवसायाच्या मुळावर आली आहे. केवळ 100 कोटी रुपयांच्या अतिरिक्त महसुलाच्या आशेपोटी सरकार पर्यटन उद्योग मारायला निघाले आहे, अशी तक्रार राज्यातील मद्य व्यवसायिकांनी केली आहे. या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संघटनेने निवेदनही सादर केले आहे.
मद्याचे दर 30 टक्क्यांनी वाढणार आहेत तसेच रेस्टॉरंटना त्यांच्या जागेच्या क्षेत्रफळानुसार परवाना शुल्क वाढविल्याने तोही मोठा फटका व्यवसायिकांना बसणार आहे. बार व रेस्टोरेंटमालक संघटनेचे अध्यक्ष मायकल कारास्को यांनी असे सांगितले की, 1 एप्रिलपासून ही दरवाढ लागू झाल्यानंतर साहजिकच ग्राहकांकडून आम्हाला ती वसूल करावी लागेल. क्षेत्रफळानुसार परवाना शुल्कात वाढ करणे हा सरासर अन्याय आहे कारण लोक जेवायला रेस्टॉरंटमध्ये येतात आणि यासाठी जागाही लागते. ही दरवाढ गोव्याचे वारसा पेय फेणीलाही लागू होणार आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार अशी माहिती मिळते की, राज्य सरकारने 2018 -19 या आर्थिक वर्षात 477 कोटी 67 लाख रुपये अबकारी कर प्राप्त केला. त्याआधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तो 16.5 टक्क्यांनी जास्त होता.
मद्याचे दर एप्रिलपासून वाढणार असल्याने गोव्याची स्वस्त दारूची ओळख पुसली जाणार आहे. गोव्याला भेट देणारे देशी पर्यटक हे गोव्यातून जाताना मोठ्या प्रमाणातमध्ये दारू खरेदी करीत असतात तसेच येथील वास्तव्यात मद्याचा आनंद लुटतात. महाराष्ट्र आणि गोव्यात बिअरच्या दारात नाममात्र 12 रुपयांचा फरक राहील असे एका व्यवसायिकाने सांगितले. पर्यटनाला फटका बसायचा नसेल ही दरवाढ मुख्यमंत्र्यांनी विनाविलंब मागे घ्यायला हवी, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे. खुल्या बाजारात बेकायदा दारूविक्री केली जाते. रस्त्यालगत फिरत्या विक्रेत्यांकडूनही बेकायदेशीररित्या मद्य विकले जाते परंतु कोणतीच कारवाई केली जात नाही. बार अँड रेस्टॉरंट मालकांना व्यवसाय सुरू करताना 14 वेगवेगळे ना हरकत दाखले घ्यावे लागतात, असेही कारास्को म्हणाले. परवाना नूतनीकरणासाठीचे सोपस्कार आणखी सुटसुटीत करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
Big Breaking : भारतीय महिला संघाची ICC Women's T20 World Cupच्या अंतिम फेरीत धडक
China Coronavirus : आता 'कोरोना'लाही विम्याचं कवच? कंपन्यांकडून तयारी सुरू
Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर पाच वर्षांत 446 कोटींचा खर्च
China Coronavirus : 'राहुल गांधींनी कोरोना चाचणी केली का?', भाजपा खासदाराचा सवाल
भाजप सरकारच्या काळात २000 कोटींची अनियमितता, कॅगचा ठपका