डिचोली - शिरगाव येथील तीन खाण व्यावसायिकांनी गेल्या पन्नास वर्षात केलेले खनिज उत्खनन हे बेकायदेशीर असून सर्व जागा ही शिरगाव कोमुनिदा द ची आगे नव्या लिझ मध्ये शिरगाव येथील चारशे घरे ,श्री लई राई मंदिर व इतर १७मंदिरे,जलस्त्रोत आदी सर्व लिझ मध्ये असल्याने या बाबत सरकारला खाण खात्याला माहिती दिली होती .मात्र असे असूनही हे सर्व खाण लिझ मध्ये असून ते तातडीने लिझ बाहेर काढण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.मुख्यमंत्र्यांनी मंदिर व घरे लिझ मधून बाहेर काढण्याची केलेली घोषणा त्याचे आम्ही स्वागत करतो .मात्र या बाबतीत तातडीने निर्णय घेवून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी श्री लईराई देवस्थानचे अध्यक्ष गणेश गावकर यानी पत्रकार परिषदेत दिली.या वेळी अटरनि जयंत गावकर उपस्थित होते.
येथील खाण लिझ मध्ये संपूर्ण गाव मंदिरे असल्याचे खाण खात्याला सरकारला कळवले होते.त्यानंतर या बाबत कागदपत्र देण्याची मागणी केली .मात्र त्यांनी टाळाटाळ केल्याने आम्ही माहिती अधिकार अंतर्गत अर्ज करून सर्व कागद मिळवले. त्यानंतर आम्ही उच्च न्यायालयात या प्रष्नी याचिका दाखल केली आहे असे गणेश गावकर यांनी सांगितले. तीन ब्लॉक मधील पूर्ण शिरगाव लिझ मध्ये आहे.2022मध्ये आम्ही ग्रामस्थांनी निवेदन दिले.त्यानंतर सरकारने लिलाव केला त्यात पूर्ण गाव लिझ मध्ये असल्याचे निदर्शनास आल्याने आम्ही तीन महिन्यांपूर्वी न्यायालयात याचिका दाखल केली आहे असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री तसेच स्थानिक आमदार यानी या बाबतीत सकारात्मक भूमिका जाहीर केल्याने आम्ही त्याच स्वागत करतो असेही त्यांनी सांगितले. १९४९मध्ये मयनिंग लिझ दीले त्यावेळी मूळ मालक शिरगाव कोमुनिदाद कसून परवानगी घेतलेली नाही जागा कोणाची हे बघून परवाने देणे बंधनकारक असूनही लिझ दिले त्यानंतर १९७२ला सर्व्हे झाला त्यावेळी खाण व्यवसायाने आपली नावे घालून घेतलेली आहेत.ही जमीन सरकारची किंवा खाण वाल्यांची नसून कोमुनिदाद ऑफ शिरगाव ची आहे .या प्रकरणी सरकारने घोळ केलेला असून खाण वाल्यांची नावे काढावीत अशी मागणी देवस्थान अध्यक्षांनी केली आहे.
आमचा खाण व्यवसायाला विरोध नाही .कायदेशीर परवानगी घेणे गरजेचे असून जमिनीची मालकी कोमुनिदाद कसे असल्याने सर्व व्यवसाय अयोग्य पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून कोमूनिदा द चे असलेले अधिकार अबाधित ठेवावेत तसेच बेकायदेशीर गोष्टींना थारा न देता योग्य ती कृती करावी अशी मागणी गणेश गावकर यांनी सरकारकडे केली आहे