कोमुनिदाद जागा हडप प्रकरणी मंत्री गुदिन्हो यांना मंत्रिमंडळातून वगळा; काँग्रेसची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2024 05:03 PM2024-01-19T17:03:30+5:302024-01-19T17:04:31+5:30
गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस कॅप्टन विरियटो फर्नांडिस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या ह्या कृत्याचा पर्दाफाश केला.
नारायण गावस
पणजी : भाजप सरकारमधील मंत्री माविन गुदिन्हाे यांनी काेमुनिदाद कायद्यातील नवीन दुरस्ती वापरुन आपल्या मुलाला ४०० चौरस मीटरचा भूखंड दिला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याची दखल घेते या मंत्र्याचे मंत्रीपद काढावे, अशी मागणी कॉँग्रेस पक्षातर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस कॅप्टन विरियटो फर्नांडिस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या ह्या कृत्याचा पर्दाफाश केला. काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर आणि जॉन नाझरेथ हे देखील यावेळी उपस्थित होते.
विरियटो फर्नांडिस म्हणाले, "प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने कोमुनिदादच्या संहितेत केलेल्या या दुरुस्त्यांमुळे भ्रष्टाचार वाढला पक्षाचे स्वतःच्या आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी कोमुनिदादच्या जमिनी बळकावण्याचे हेतू आणि स्वार्थी हेतू उघड झाले आहेत." जून २०२३ मध्ये, कोमुनिदादच्या प्रधान संहितेच्या कलम ३३४- अ मध्ये १८ वर्षे पूर्ण झालेल्या संबंधित कोमुनिदादच्या भागधारकाच्या "भूमिहीन" मुलांना कोमुनिदादचे भूखंड वाटप करण्याची परवानगी देण्यासाठी सोयीस्करपणे दुरुस्ती करण्यात आली. पण या लोकांना त्याचा लाभ होत नाही मंत्री आमदार आपला लाकान ही जागता हडप करुन देत आहे.
कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, मंत्र्यांच्या मुलाने शपथपत्रात असे म्हटले आहे की त्यांच्याकडे कोणतीही निवासी जमीन नाही आणि त्यांना नवीन वाटपानुसार जमीन देण्यात यावी. पण त्याच्या नावावर आधीच तीन प्लॉट आहेत. हे एकूण भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे, जिथे मंत्र्यांच्या मुलाला नवीन दुरुस्तीचा फायदा झाला आहे.
ते म्हणाले की, कोणतेही शासकीय प्रमाणपत्र घेताना सर्वसामान्यांना त्रास दिला जातो, मात्र मंत्र्यांच्या पुत्रांना दुरुस्त्या करून भूखंड दिले जातात. मुख्यमंत्री या प्रकरणात गुंतले आहेत कारण त्यांच्या सरकारने दुरुस्ती केली आहे. या भ्रष्ट मंत्र्याला तात्काळ बडतर्फ करावे,’ अशी मागणी पाटकर यांनी केली.