एक्झिट पोल दिशाभूल करणारे, इंडिया आघाडीचे सरकार येणार : कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 04:33 PM2024-06-03T16:33:33+5:302024-06-03T16:33:51+5:30
आमचे सरकार स्थापन झाल्यावर कॉँग्रेसने दिलेली पाच आश्वासने पूर्ण केली जाणार आहे, असे कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
नारायण गावस
पणजी: एक्झिट पोल जरी भाजपच्या बाजूने असले तरी देशात उद्या इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांनी कुठल्याच दबावाखाली येऊन काम करु नये, आमचे सरकार स्थापन झाल्यावर कॉँग्रेसने दिलेली पाच आश्वासने पूर्ण केली जाणार आहे, असे कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत कॉँग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर व इतर उपस्थित होते.
हे एक्झिट पोल चुकीचे आहे. कुठलाच अभ्यास न करता काही प्रसारमाध्यमांंवर दबाव आणून हे एक्झिट पोल करायला लावले आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी हा एक्झिट पोल आहे. कुठल्याच निवडूक कर्मचाऱ्यांनी या सरकारच्या दबावाखाली येऊ नये. आपले काम पारदर्शक करावे. उद्यापासून इंडिया आघाडी सरकार येणार असून भाजपला घरी जावे लागणार आहे. भाजपच्या नेत्यांनी एक्झिट पोल करुन फक़्त भाजपाची हवा केली आहे ही हवा उद्या जाणार आहे.
पाटकर म्हणाले, या भाजप सरकाच्या हुकुमशाहीला देशभरातील जनता कंटाळली होती. म्हणून लोकांनी यंदा माेठ्या प्रमाणात कॉँग्रेस व तसेच इंडिया आघाडीच्या उमेदवार केले आहे. या भाजप सरकारने गेल्या १० वर्षात देशाच्या जनतेची फसवणूक केली आहे. आता निवडणुकांच्या काळात या सरकारने लाेकांना दिलेली आश्वासने खाेटी आहे. पण भाजपच्या या भूलथापांना आता देशाची जनता बळी पडलेली नाही.
पाटकर म्हणाले, भाजपचे नेते ४०० पारचा नारा देत होते पण आता त्यांना कळाले आहे त्यांचे उमेदवार मोठ्या प्रमाणात पराभूत होणार आहे. देशभर आता कॉँग्रेसचे वारे आहे. त्यामुळे आता भाजपचे हुकूमशाही चालणार नाही. उद्यापासून नरेंद्र मोदी सरकार जाणार असून कॉँग्रेसचे सरकार देशात राज्य करणार आहे.