शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
4
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
5
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
6
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
7
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
8
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
9
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
10
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
12
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
13
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
14
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
15
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
16
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
17
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
19
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

अतिरेक्याचे गोव्यात प्रशिक्षण

By admin | Published: September 07, 2015 3:15 AM

पणजी : इंडियन मुजाहिदीनचा (आयएम) खतरनाक अतिरेकी सईद इस्माईल अफाक याने गोव्यात पाच दिवस पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेतल्याचे

पणजी : इंडियन मुजाहिदीनचा (आयएम) खतरनाक अतिरेकी सईद इस्माईल अफाक याने गोव्यात पाच दिवस पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेतल्याचे त्याच्या चौकशीतून उघड झाले आहे. अफाकला ८ जानेवारी २०१५ मध्ये कर्नाटकमधील बंगळुरू येथे अटक करण्यात आली. सध्या तो बंगळुरू येथे कोठडीत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने अफाकच्या केलेल्या चौकशीत त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले. बंगळुरू येथील प्रशिक्षकाकडून त्याने पाच दिवस पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेतल्याचे त्याने सांगितल्याचा उल्लेख ‘एनआयए’ या तपास संस्थेच्या आरोपपत्रात आहे. गोव्यात पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेतल्यानंतर अफाकने अमेरिकेतून दोन पॅराग्लायडिंग किट्ससुद्धा खरेदी केली होती. परंतु त्यानंतर त्याने गोव्यात पुन्हा पॅराग्लायडिंग केले की नाही, याबद्दल ‘एनआयए’ला माहिती मिळाली नाही. अतिरेकी त्रिकुटापैकी जानेवारीत अफाक आणि अबदस सबुर यांना बंगळुरू येथे अटक झाली होती. तर सद्दाम हुसेन यास कर्नाटकमधील भटकळ येथे अटक करण्यात आली होती. त्यानंतर ‘एनआयए’कडून त्यांची चौकशी सुरू झाल्यानंतर अफाकच्या गोव्यातील वास्तव्याबद्दल माहिती उघड झाली. संबंधित प्रकार उघड झाल्यानंतर पॅराग्लायडर्सवरही नजर ठेवण्याच्या सूचना राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आल्या आहेत. गोव्यात अतिरेकी येऊन पाच दिवस प्रशिक्षण घेऊन गेल्याचा ठावठिकाणा येथील पोलीस यंत्रणांना तर लागलाच नव्हता. एवढेच नव्हे तर त्याच्या प्रशिक्षकालाही त्याची कल्पना नव्हती, अशी माहिती ‘एनआयए’च्या सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, या सर्व घटनांमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे. असे असले तरीही सर्वच क्षेत्रांतील नागरिकांनी, विशेषत: गजबजलेल्या समुद्रकिनारी भागात विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. अतिरेक्यांच्या यादीवर गोवा सॉफ्ट टार्गेट म्हणून ओळखला जातो. (प्रतिनिधी)