पणजी - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार लक्ष्मण पै यांचे आज निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या कलेचा गौरव करत भारत सरकारने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले होते. (Famous international painter Laxman Pai passed away)
लक्ष्मण पै यांचा जन्म २१ जानेवारी १९२६ रोजी गोव्यातील मडगाव येथे झाला होता. त्यांनी कलेचे शिक्षण मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून घेतले. त्यानंतर कलेच्या अधिक अभ्यासासाठी त्यांनी फ्रान्समध्ये दहा वर्षे वास्तव्य केले होते. त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भारतासह जगभरात आयोजित झालेली आहे. त्यांना भारत सरकारने १९८५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. १९७७ ते १९८७ या काळात लक्ष्मण पै यांनी गोवा कॉलेज ऑफ आर्ट्सचे प्राचार्य म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर १९८७ मध्ये गोवा सरकारने त्यांना सन्मानित केले होते. पुढे भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित केले.