लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: दिवाळी निमित्त सुटी असल्याने मोठ्या प्रमाणात लोक पिकनिक टुरचे प्लान करत आहेत. अनेक लोक शेजारील राज्य महाराष्ट्र तसेच कर्नाटकात कुटुंबासहित फिरायला जात आहेत. यामुळे ट्रॅव्हल्सचे दरही सध्या वाढले आहेत. गोव्यातून कोल्हापूर जाण्यासाठी कदंब किंवा एसटीचा तिकिट दर ५०० रुपये तर ट्रॅव्हलसाठी १५०० रुपये प्रती व्यक्ती खर्च येऊ शकतो.
कोल्हापूर जाण्यासाठी प्रत्येकी व्यक्ती १५०० हजार हजार रुपये आकारले जातात. तर त्याच एसटी किंवा कदंबचा येण्या जाण्याचा खर्च निम्मा म्हणजे १ हजार रुपये येऊ शकतो. परंतु, लोकांचा अधिक कल ट्रॅव्हल कडे असतो. कारण त्यांना हव्या त्या ठिकाणी उतरणो सोपे आणि प्रवास आरामदायी ठरतो.
खासगी भाडोत्री गाड्यांनाही मागणी
ट्रॅव्हलर्सप्रमाणे इतर खासगी गाड्या करुन फिरायला जाण्याचा जोर सध्या वाढला आहे. लोक लहान वाहने भाडोत्री घेत कुटुंबासहीत फिरायला जातात. यामुळे लोकांना आपल्याला हवे तिथे जाण्याची संधी मिळते. या खर्चही जास्त येतो. यावेळी किलोमीटर प्रमाणे चालकांकडून पैस आकारले जातात. तर रात्रीचा मुक्काम असल्यास आणखी अतिरिक्त भाडे आकारले जाते. पण आरामदायी असल्याने लोक अशा खासगी गाड्या करुन मोठ्या प्रमाणात दूर करतात.
गोव्यातील लोक शिर्डी, कोल्हापूर, पंढरपूर, महाबळेश्वर यासाखी तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळे पाहण्यासाठी जात असतात. सध्या सुट्टी असल्याने लोक मोठ्या प्रमाणात जात आहेत. यामुळे ट्रॅव्हलर्सवाल्याचा व खासगी भाडोत्री गाड्यांचा व्यावसायही तेजीत आहे.