शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

शेतकऱ्यांनी 'भिवपाची गरज ना'! मुख्यमंत्री सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 9:05 AM

केंद्र, राज्य सरकारच्या सहकार्याने हरितक्रांती घडविण्याचा निर्धार करूया

लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे: शेतीद्वारे हरितक्रांती घडवण्यासाठी शेती व्यवसाय आणि त्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या योजना, अनुदान वेळेवर देण्याची जबाबदारी सरकारची आहे. हरितक्रांती घडविण्याचा निर्धार करूया. केंद्र सरकार आणि राज्य सरकार शंभर टक्के शेतकऱ्यांसोबत आहे. त्यामुळे कुणालाही भिवपाची गरज ना, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

पेडणे येथील गोवा कृषी उत्पादन मार्केटिंग यार्ड विस्तारित इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर, मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर, समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर, कृषी उत्पादन मार्केटिंग महामंडळाचे चेअरमन प्रकाश वेळीप, संचालक किशोर शेट मांद्रेकर व इतर संचालक मंडळ उपस्थित होते.

काजू बागायतीमध्ये करा हळद लागवड आणि नफा कमवा

जर काजूच्या बागायतीमध्ये हळदीची लागवड केली, तर मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळू शकेल. हे उत्पादन मार्केट यार्डने घ्यावे, त्यासाठी प्रयत्न करावेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

अद्ययावत कृषी प्रशिक्षण घ्या

शेतीला प्राधान्य देण्याबरोबरच विविध प्रकारचे प्रशिक्षण शेतकऱ्यांनी घ्यावे. ज्या पद्धतीने चारा लागवड किंवा मक्याची लागवड केल्यानंतर गाईंना चारा मिळू शकतो, तशा पद्धतीने दुहेरी सदुपयोगाच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.३ मक्याची लागवड करा. आज मोठ्या प्रमाणात पाळीव जनावरे, फार्महाऊस आहे, त्यांना या वस्तूंची गरज लागते. बाहेरून लाखो कोट्यवधी रुपयांचा माल आणावा लागतो. त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी गोव्यात उत्पादन घेतले, तर त्याचा लाभ मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

शेतकऱ्यांनी सॉईल कार्डही बनवावे

विद्यार्थी आणि युवा पिढी आता कृषीविषयक अभ्यासक्रमातही भाग घेत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे ज्या पद्धतीने आधारकार्ड आहे. तसेच कृषी कार्ड आवश्यक आहे आणि त्याला जोडूनच सॉईल काही महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.

काय म्हणाले मुख्यमंत्री

शेतकऱ्यांना सुपारी, भात बियाणे यासंदर्भात गेल्यावर्षीचे अनुदान लवकरात लवकर देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आपली बिले संबंधित विभागाकडे सुपूर्द करावीत, असे आवाहन केले. शेतकऱ्यांनी शेतीचे प्रयोग करण्यासह शेतामध्ये कसल्या प्रकारचे उत्पादन लाभदायक ठरेल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच राज्यात हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून मार्केटिंग यार्डने प्रयत्न करावेत आणि उत्पादन घेण्याची प्रक्रिया करावी, असे आवाहन केले. ज्या पद्धतीने आपल्याकडे हेल्थ कार्ड आहे, त्याच पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्याला कृषी कार्ड असणे महत्त्वाचे आहे. आता जमीन संबंधी कार्ड आवश्यक आहे. आपल्या जमिनीमध्ये कशा प्रकारचे पीक, खत उपयुक्त ठरणार आणि त्यानंतर आपण त्या शेतामध्ये पीक घेणार, याविषयी ज्ञान आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून प्रत्येक शेतकऱ्याने प्रयत्न करावेत, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार जमा केले आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवतात. त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन आपली शेती करून शेतीद्वारे क्रांती करावी, असे आवाहन केले. चेअरमन प्रकाश वेळीप यांनी मार्केट यार्डचा धावता आढावा घेतला. - श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत