शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

गोव्यात फॉर्मेलिनप्रकरणी एफडीएने पुन्हा नाड्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 8:16 PM

कडक तपासणी : चेक नाक्यांवरुन वाहने परत पाठवली 

ठळक मुद्देपोळें व पत्रादेवी येथे तपासणी करुन गेल्या काही दिवसात अनेक मासळीवाहू वाहने माघारी पाठवण्यात आली. फॉर्मेलिन हे रसायन मानवी मृतदेह टिकून रहावा यासाठी मृत माणसाच्या शरीराला लावले जाते.

पणजी : गोव्यात परराज्यातून फॉर्मेलिनयुक्त मासळी विक्रीसाठी येऊ नये यासाठी एफडीएने पुन्हा एकदा नाड्या आवळल्या आहेत. राज्यात मासेमारीबंदीचा काळ असल्याने शेजारी महाराष्ट्रातून रत्नागिरी तसेच अन्य भागातून इतकेच नव्हे तर कर्नाटक, केरळ, तामीळनाडूतून गोव्यात मासळी पाठवली जाते. चेक नाक्यांवर मासळीवाहू वाहने अडवून क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडिया तसेच अन्न व औषध प्रशासन अधिकारी मासळीची तपासणी करीत आहेत. पोळें व पत्रादेवी येथे तपासणी करुन गेल्या काही दिवसात अनेक मासळीवाहू वाहने माघारी पाठवण्यात आली. 

मासळीचे नमुने तपासले परंतु कोठेही फॉर्मेलिनयुक्त मासळी सापडलेली नसल्याचा दावा सरकारी सूत्रांनी केला आहे. राज्य सरकारने मासळीवाहू ट्रक, पिकअप आदी वाहने इन्सुलेटेट असणे सक्तीचे केले आहे तसेच या वाहनांना मासळीच्या वाहतुकीसाठी एफडीएचे परवानेही अनिवार्य केले आहेत. काही वाहने इन्सुलेटेड नसतात तसेच एफडीए किंवा अन्य यंत्रणांचे परवानेही त्यांच्याकडे नसतात. आवश्यक ते परवाने तसेच दस्तऐवज नसल्याने ही वाहने परत पाठवण्यात आली. 

क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडियाने चेक नाक्यांवर कार्यालयेच थाटली असून पुढील काळात २४ तास मासळीवाहू वाहनांची तपासणी केली जात आहे. अन्न व औषध प्रशासन अधिकारीही तपासणीच्यावेळी प्रत्यक्ष उपस्थित असतात. पोलिस किंवा वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांशी समन्वयाबाबत एफडीए क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करीत आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये फॉर्मेलिनयुक्त मासळीचा प्रश्न ऐरणीवर आला होता त्यानंतर काही काळ परप्रांतातून गोव्यात येणाऱ्या मासळीवर बंदी घालण्यात आली. परंतु नंतर काही दस्तऐवज व परवाने सक्तीचे करुन ही बंदी उठविण्यात आली. फॉर्मेलिन हे रसायन मानवी मृतदेह टिकून रहावा यासाठी मृत माणसाच्या शरीराला लावले जाते. हेच रसायन मासळी टिकून रहावी यासाठी वापरले जात असल्याचे आढळून आल्याने परराज्यातून गोव्यात येणाऱ्या मासळीच्याबाबतीत राज्य सरकारने कडक धोरण अवलंबिले आहे. सध्या गोव्यात मासेमारीबंदी असल्याने येथे मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. 

टॅग्स :goaगोवाfishermanमच्छीमारFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग