शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

गोव्यात फेस्टीव्ह मोसम सुरू, नाताळची जय्यत तयारी...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 1:19 PM

नाताळनिमित्ताने ख्रिस्ती घरांवर आकर्षक रोषणाई केली जाईल.

पणजी : गोव्यात फेस्टीव्ह मोसम सुरू झाला आहे. सेरेंडिपीटी फेस्टीव्हल, नाताळ सण, इलेक्ट्रॉनिक डान्स महोत्सव (ईडीएम) असे अनेक सोहळे डिसेंबरमध्ये महिन्यात होणार आहेत. नाताळची राज्यात जोरदार तयारी सुरू झाली आहे. लाखो पर्यटकांची गर्दी डिसेंबरच्या अखेरीस गोव्यात होणार आहे.

जगप्रसिद्ध सेंट झेवियरचे फेस्त गेल्याच आठवड्यात जुनेगोवे येथे पार पडले. लाखो पर्यटक त्यावेळीही पणजी व जुनेगोवेत येऊन गेले. पणजीच्या चर्चचे फेस्त सोमवारी सुरू झाले. जत्रा आणि फेस्टीव्हलचा हंगाम सुरू झाला आहे. दि. 25 डिसेंबरपासून नाताळला आरंभ होईल. नाताळमध्ये गोवा पाहणो म्हणजे अनोखा अनुभव असतो. नाताळनिमित्ताने राजधानी पणजीसह बार्देश, सासष्टी, मुरगाव हे तालुके सजू लागले आहेत. गोव्यातील बारापैकी चार तालुक्यांमध्ये ख्रिस्ती धर्मीय बांधवांची संख्या बऱ्यापैकी आहे. मात्र नाताळ सण हा केवळ ख्रिस्ती गोमंतकीयांपुरताच आता मर्यादित राहिलेला नाही. नाताळमध्ये अनेक हिंदू बांधवही सहभागी होतात. नाताळ फेस्टीव्हल हे गोव्याच्या पर्यटन उद्योगाचेही एक महत्त्वाचे अंग बनले आहे.

नाताळनिमित्ताने ख्रिस्ती घरांवर आकर्षक रोषणाई केली जाईल. तसेच राज्यभरातील हॉटेल्सचे सौंदर्य वेगळा साज प्राप्त करील. गोव्याच्या उत्तर व दक्षिण किनारपट्टीला नाताळ सणाची चाहूल लागली आहे. पणजीसह किनारी भागात रंगरंगोटीचे व सजावटीचे काम सुरू आहे. नाताळानिमित्ताने व्यापा-यांनी ग्राहकांसाठी विविध ऑफर्स काढल्या आहेत. नववर्ष साजरे करण्यासाठी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लाखो पर्यटक गोव्यात येतील. गोव्याकडे येणा-या विमानांच्या तिकीटाचे दर हे 20 डिसेंबरपासून वाढणार आहेत. देशभरातील अनेक बडे राजकीय नेते, उद्योगपती, बॉलिवूडमधील सिनेतारे व तारका 30 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळात दरर्षी गोव्यात असतात. यापूर्वी बच्चन कुटुंबासह अंबानी व अन्य अनेकांनी गोव्यात नववर्ष साजरे केले आहे. यावेळीही अनेक प्रसिद्ध व्यक्तींची कुटुंबे 31 डिसेंबरची रात्र गोव्यात घालवतील. 

27 ते 29 डिसेंबर असे तीन दिवस उत्तर गोव्यातील वागातोर समुद्रकिनारी सनबर्न क्लासिक हा इलेक्ट्रॉनिक डान्स महोत्सव (ईडीएम) होणार आहे. या महोत्सवात पन्नास हजारपेक्षा जास्त पर्यटक व गोमंतकीय मिळून भाग घेऊन तीन दिवस अखंडीतपणो कर्णकर्कश संगीताच्या तालावर नृत्य करणार आहेत.

दक्षिण आशियामध्ये कला उत्पादनाला बळ मिळवून देण्यासाठी वावरणा-या सेरेंडिपीटी आर्ट्स फाऊंडेशनचा सेरेंडिपीटी हा प्रसिद्ध महोत्सव येत्या 15 पासून गोव्यात सुरू होणार आहे. त्यामुळेही पणजी ते जुनेगोवेर्पयतच्या पट्टय़ातील मोठ्या इमारतींवर आकर्षक अशा चित्रकृती रंगविण्याचे काम सध्या सुरू आहे. काही चित्रे साकारली आहेत. 22 डिसेंबपर्यंत हा कला उत्सव चालेल. गेल्याच आठवड्यात तीन दिवसांचा कला व साहित्य महोत्सव पार पडला. त्यात गोव्यासह विदेशातीलही अनेक लेखकांनी भाग घेतला. 

टॅग्स :goaगोवा