शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

गोव्यातील मोबोर किनाऱ्याजवळील सोळा दुकानांना आग लागून वीस लाखांची हानी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 9:28 PM

- गोव्यातील दक्षिण गोव्यातील मोबोर समुद्रकिनाऱ्यानजीक असलेल्या सोळा दुकानांना आज रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागून  वीस  लाखांची हानी झाली.

मडगाव - गोव्यातील दक्षिण गोव्यातील मोबोर समुद्रकिनाऱ्यानजीक असलेल्या सोळा दुकानांना आज रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागून  वीस  लाखांची हानी झाली. दुपारी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मडगाव अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेउन तब्बल पाच तास अथक प्रयत्न करुन शेवटी ही आग विझविली. या दुर्घटनेत एकूण 50 लाखांची मालमत्ता बचाविण्यात आल्याची माहिती मडगाव अग्निशामक दलाच्या कार्यालयातून देण्यात आली. आगीचे नेमके कारण स्पष्ट होउ शकले नाही. कोलवा पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.अँथनी कादरेज व त्यांचा भाऊ विल्सन कादरेज यांच्या मालकीच्या आठ दुकानांना आग लागली. या दुकानांत रेडिमेड कपडे, कृत्रिम दागिने, बाहुल्या व अन्य वस्तु विकल्या जात होत्या. या आगीत कादरेज बंधुचे एकूण दहा  लाखांची मालमत्ता जळून खाक झाली  तर फ्रेडी कादरेज यांच्या मालकीच्याही आठ दुकानांना आग लागली. याही दुकानांमध्ये कृत्रिम दागिने, रेडीमेड कपडे व अन्य वस्तु विकल्या जात होत्या. फ्रेडी यांचे या दुर्घटनेत एकूण दहा लाखांच्या मालमत्तेची हानी झाली.ही सर्व दुकाने एकमेकांना लागून होती. आग लागल्यानंतर दुकानातील वस्तु काहीजणांनी बाहेर काढून दुसरीकडे हलविल्या. दुपारी सुटलेल्या वा:यांमुळे आग फैलावत गेली व जवळपासच्या दुकानांला आगीने वेढले.आग विझविण्यासाठी मडगाव अग्निशामक दलाच्या कार्यालयातून दोन बंब तर कुडचडे येथून एक बंबचा वापर केला. जवळच्या एका हॉटेलातून बंबमध्ये पाणी भरुन आग विझविण्यात आली. अग्निशामक दलाचे सतीश साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पेश नाईक, एम.व्ही वेळीप, जी. जोशी, एम . आर. वरक ,जी.एस. नाईक  एन. जी नाईक यांनी आग विझविण्याची कामगिरी बजाविली. 

टॅग्स :goaगोवा