पणजी : शेजारील राज्यांतून मासळीची आयात बंद असल्याने गोव्यात मासळीची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. मासळी बाजारात शुकशुकाट निर्माण झाला असून जी काही अल्प प्रमाणातील स्थानिक मासळी उपलब्ध आहे, त्याचे दरही पाच ते सात पटींनी वाढल्याने लोकांना शाकाहार घ्यावा लागला. मालवण समुद्र हद्दीत गोवा-सिंधुदुर्ग ट्रॉलरवाल्यांच्या धुमश्चक्रीनंतर गोव्यातील मच्छीमारांनी आयात रोखली आहे. बुधवारीही बाजारात मासळी येणार नाही. (पान २ वर) आणखी वृत्त/हॅलो र्१
राज्यात मासळीची टंचाइ
By admin | Published: May 13, 2015 1:06 AM