सूरज नाईक पवार, लोकमत न्युजनेटवर्क, मडगाव: मासेमारीचा शौक एका ३० वर्षीय कामगाराच्या जीवावर बेतला. शंकर केरकट्टा असे मयताचे नाव आहे गोव्यातील सासष्टीच्या चांदर येथे वरील घटना मंगळवारी घडली.तळयात मित्रासमंवेत तो मासेमारीसाठी उत्तरला असता, वीजेचा झटका त्याला बसला. या जोरदार झटक्याने तो मृत पावला. मयत मूळ झारखंड राज्यातील आहे. तो चांदर येथे भाडयाच्या घरात रहात होता. आपल्या अन्य सहा मित्रासंमवेत भाडयाच्या घराशेजारी असलेल्या तळयात इलेक्ट्रोफिशिंग पध्दतीने मासे पकडण्यासाठी उतरला होता. त्याला अचानक वीजेचा जोरदार झटका बसला. यात तो मृत पावला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मायणा कुडतरी पाेलिसांनी त्वरीत तेथे धाव घेतली. संतोष याला लागलीच येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेण्यात आले. मात्र तेथील डाॅक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. मृतदेह इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे. अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे. उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी पुढील तपास करीत आहेत.