शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

गोव्यातील मच्छिमारी जेटी ओस; चतुर्थीनंतरच मासेमारी हंगाम सुरु होण्याची चिन्हे

By किशोर कुबल | Published: August 31, 2023 3:36 PM

- ट्रॅालर्स बंदच

किशोर कुबल, पणजी : गोव्यात मासेमारीवरील बंदी उठून महिना होत आला. काल नारळी पौर्णिमेला समुद्राची पुजा करुन नारळही अर्पण झाला. परंतु मासेमारी काही सुरु होऊ शकलेली नाही. मालिम जेटीसह अन्य काही मच्छिमारी जेटी अजूनही सुन्या- सुन्या आहेत. गांवी गेलेले खलाशी न परतल्याने ट्रॉलर्स बंद आहेत. राज्याच्या अर्थकारणात मोठा हातभार लावणारा मच्छिमारी व्यवसाय ठप्पच आहे.

गोव्यात १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारीवर कायद्याने बंदी आहे. हा काळ मासळीचा प्रजनन काळ असल्याने समुद्रात मासेमारी होऊ नये यासाठी ही बंदी आहे. राज्यात एकूण सात मच्छिमारी जेटींवर मिळून १२00 हून अधिक ट्रॉलर्स आहेत. मालिम जेटीवरील मांडवी फिशरमेन्स को ॲापरेटिव्ह सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा ट्रॉलरमालक सीताकांत परब याना विचारले असता ते म्हणाले की, ‘ ट्रॉलर्सवर खलाशी म्हणून काम करणारे मजूर झारखंड, ओडिशा तसेच अन्य राज्यातून येतात.पावसाळ्यात मासेमारी बंद असते त्यावेळी शेती करण्यासाठी ते गांवी परततात. खलाशी अजून परतलेले नाहीत.

लहान ट्रॉलर्सवर सुमारे १० ते १५ आणि मोठ्या ट्रॉलरवर २० ते २५ खलाशी लागतात. गांवी गेलेले खलाशी अजून परतलेले नाहीत. आता चतुर्थीनंतरच मासेमारी सुरु होईल, अशी चिन्हे आहेत.’  अन्य एका ट्रॉलरमालकाने दिलेल्या माहितीनुसार ‘फयान वादळात गोव्यातील ट्रॅालर्स बुडून ६८ खलाशी बेपत्ता झाल्यानंतर खलाशी आता समुद्र पूर्णपणे शांत झाल्याशिवाय ट्रॅालरवर यायला बघत नाहीत. जीव धोक्यात घालणे त्यांना पसंत नसते. काही मालक बसगाड्या गावी पाठवून खलाशांना आणतात. अवघ्याच काही जणांनी कामगार आणलेले आहे.

कुटबण, वास्को, शापोरा, बेतुल, कुठ्ठाळी जेटींवर काही प्रमाणात व्यवसाय सुरु झालेला आहे. अधुनमधुन हवामानही खराब असते. समुद्र खवळलेला असतो त्यामुळे मासेमारीसाठी मच्छिमार जात नाहीत. मालिम जेटी ही गोव्यातील सर्वात मोठी मच्छीमारी मानली जाते. येथे सुमारे ३५० ट्रॉलर्स आहेत. ट्रॉलरमालकांची आणखी एक समस्या आहे ती म्हणजे डिझेल महागले आहे. मासेमारीसाठी ट्रॉलर गेले तरी मासळी मिळत नाही आणि इंधनाचा खर्चही भागत नाही. खलाशी म्हणून  असलेल्या परप्रांतीय कामगारांना पगार द्यावा लागतो तो वेगळाच. मासळी व्यवसायात आता कोणतीच मिळकत राहिलेली नाही, असे काही व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

दोन वर्षांचे अनुदान नाही, डिझेल भरण्यासाठी पैसे आणावे कुठून? अखिल गोवा मच्छिमारी बोट संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा म्हणाले कि, ‘ खलाशांची समस्या आहेच, शिवाय सरकारने गेल्या दोन वर्षाचे डिझेलवर व्हॅटमध्ये सवलतीच्या स्वरूपात अनुदान दिले जाणारे अनुदान ट्रॉलरमालकांना दिलेले नाही. डिझेलसाठी पैसे नसल्याने अनेक ट्रॉलरमालकांनी मासेमारी बंद ठेवली आहे. गोवा सरकार वर्षाकाठी केवळ ३० हजार लिटरवर अनुदान देते. कर्नाटकात ९० हजार लिटर डिझेलवर अनुदान दिले जाते.’ 

टॅग्स :goaगोवा