शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

भयानक: त्या साडेपाच वर्षीय मुलीवर बलात्कार करून केला खून

By पंकज शेट्ये | Published: April 12, 2024 10:28 PM

वाडे तालावाच्या जवळील परिसरात बांधकाम चालू असलेल्या एका इमारतीच्या परिसरात संशयास्पद मरण पावलेल्या साडेपाच वर्षीय मुलीवर शुक्रवारी मडगाव जिल्हा इस्पितळात शवचिकीत्सा करण्यात आली.

वास्को: वाडे, दाबोळी येथे संशयास्पद मरण पावलेल्या त्या साडेपाच वर्षीय मुलीच्या मृतदेहावर शवचिकीत्सा केली असता तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे अहवालातून निश्पन्न झाले. मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिचे नाक दाबून आणि गळा आवळून खून केल्याचे शवचीकीत्सक अहवालातून उघड झाल्याची माहीती दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली. वास्को पोलीसांनी त्या प्रकरणात अज्ञात आरोपीविरुद्ध भादस ३०२, ३७६, गोवा बाल कायदा आणि पोक्सो कायद्याच्या कलमाखाली गुन्हा नोंद केला असून त्या मुलीचा बलात्कार करून हत्या केलेल्या आरोपीला गजाआड करण्यासाठी पोलीस सर्व मार्गाने चौकशी करीत आहेत.

वाडे तालावाच्या जवळील परिसरात बांधकाम चालू असलेल्या एका इमारतीच्या परिसरात संशयास्पद मरण पावलेल्या साडेपाच वर्षीय मुलीवर शुक्रवारी मडगाव जिल्हा इस्पितळात शवचिकीत्सा करण्यात आली. शवचिकीत्सक अहवालातून मुलीवर अज्ञात आरोपीने बलात्कार करून तिचे नाक दाबून आणि गळा आवळून खून केल्याचे उघड झाल्याची माहीती दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक सुनिता सावंत यांनी दिली. मुलीवर बलात्कार आणि तिचा खून झाल्याचे उघड झाल्यानंतर पोलीसांनी त्या आरोपींना गजाआड करण्यासाठी सर्व मार्गाने चौकशीला सुरवात केली आहे. साडेपाच वर्षीय मुलगी आई वडीलासहीत इमारतीचे बांधकाम चालू असलेल्या जवळच्याच परिसरात एका खोलीत राहत होती. शुक्रवारी पहाटे मुलीचा मृत्यू झाल्याने गुरूवारी रात्री बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या परिसरात राहत असलेल्या २० कामगारांना (बांधकाम चालू असलेल्या इमारतीचे काम करणारे) पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांच्याशी कसून चौकशी चालू आहे. गुरूवारी रात्री तेथील काही कामगार भरपूर दारूच्या नशेत असल्याचे चौकशीत कळाल्याची माहीती पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांनी देऊन त्यापैंकी कोणीतरी त्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली आहे का त्याबाबतही पोलीस चौकशी करीत आहे. वास्को पोलीस सर्व मार्गाने चौकशी करीत असून लवकरच मुलीवर अत्याचार करून तिचा खून केलेल्या दोषींना गजाआड करण्यास आम्हाला यश मिळेल असा विश्वास सुनिता सावंत यांनी व्यक्त केला.

१२ पर्यंत खेळत होतीसाडेपाच वर्षीय मुलीचा वडील एका इमारतीत सुरक्षा रक्षक (वॉचमेन) म्हणून कामाला आहे. गुरूवारी रात्री १२ पर्यंत ती जेथे वडील कामाला आहे तेथे त्यांच्याबरोबर थांबून तेथे खेळत होती. ज्या ठीकाणी साडेपाच वर्षीय मुलगी राहत असलेली खोली आहे त्याच्या थोड्याच अंतरावर तिचे वडील सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत. रात्रीचे सुमारे १२ वाजल्यानंतर वडिलाने मुलीला घरी जाऊन झोपण्यास सांगितले. त्यानंतर रात्री २ वाजता ड्युटी संपवून वडील घरी गेला असता तिची मुलगी घरी पोचलीच नसल्याचे त्यांना समजले. त्यानंतर तिचा शोध घेतला असता बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या परिसरात त्यांची मुलगी पडलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर ते तिला घेऊन इस्पितळात पोचले. मात्र इस्पितळात पोचण्यापूर्वीच ती मरण पावली होती.

वडीलांनी त्या कामगारांना दारूच्या नशेत पाहीले होते. बांधकाम चालू असलेल्या इमारतीत कामाला असलेले काही कामगार गुरूवारी रात्री दारू पित भरपूर नशेत असल्याचे सुरक्षा रक्षक म्हणून कामाला असलेल्या मुलीच्या वडीलाने पाहीले होते. नंतर रात्री त्यांना त्यांची मुलगी बांधकाम चालू असलेल्या इमारतीत पडलेल्या अवस्थेत मिळाल्यानंतर दारूच्या भरपूर नशेत असलेल्या त्या कामगारांनी आपल्या मुलीची अशी अवस्था केल्याच्या संशयावरून त्यांने जाऊन त्यापैंकी काही कामगारांची मारहाण केली अशी माहीती पोलीस सूत्रांकडून मिळाली.

९ महीन्यापूर्वीच आई - वडीलासहीत साडेपाच वर्षीय मुलगी वाडे, दाबोळी येथे रहायला आली होतीबलात्कार आणि खून झालेली साडेपाच वर्षाची मुलगी सुमारे ९ महीन्यापूर्वीच आपल्या आई - वडीलासहीत वाडे, दाबोळी येथे राहण्यासाठी आली होती. वाडे येथे इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी मिळाल्याने त्या मुलीचा वडील तिला आणि तिच्या आईला घेऊन तेथे खोलीत राहण्यासाठी आला होता अशी माहीती पोलीसांना चौकशीत मिळाली.