समीर नाईक, पणजी: पणजी शिगमोत्सव समितीतर्फे राजधानीत शनिवारी आयोजित शिगमोत्सव मिरवणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यावेळी फोंडावासियांचेच वर्चस्व दिसून आले. निकालानुसार रोमटामेळ गटात आडपई, फोंडा येथील सुयोग शिगमोत्सव मंडळ यांना, तर चित्ररथ गटात बांदोडा, फोंडा येथील महालक्ष्मी नागरिक समिती आणि लोककला नृत्य गटात कुर्टी, फोंडा येथील सरस्वती कला मंडळ यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
सविस्तर निकाल खालील प्रमाणे:
- रोमटामेळ गट
सुयोग शिगमोत्सव मंडळ आडपई - फोंडा, काकोडा शिगमोत्सव समिती - कुडचडे, श्री मंडलेश्वर मंगुरू शिगमोत्सव समिती, खांडेपार शिगमोत्सव समिती - खांडेपार, व श्री पाईकदेव शिगमोत्सव समिती यांना अनुक्रमे पाहिले ते पाचवे बक्षीस मिळाले.
- चित्ररथ गट
महालक्ष्मी नागरिक समिती बांदोडा - फोंडा, कुंभारजुवे नागरिक समिती - कुंभारजुवे, श्री देव दाडेश्वर स्पोर्ट्स आणि कल्चरल क्लब - नेरूल, कस्सवाडा नागरिक समिती, व आडपई युवक संघ - आडपई यांना अनुक्रमे पाहिले ते पाचवे बक्षीस मिळाले.
- लोककला नृत्य गट
सरस्वती कला मंडळ कूर्टी - फोंडा, सावईवेरेचो सख्या हरी - सावईवेरे, श्री नवदुर्गा कला आणि संस्कृती मंडळ, विजया कला मंडळ, व ओम नमः शिवाय कला मंडळ यांना अनुक्रमे पाहिले ते पाचवे बक्षीस मिळाले.
- वेशभूषा गट (वैयक्तिक सिनियर)
धनंजय नाईक (वीरभद्र), देवेंद्र अकारकर (शेतकरी), मदन तारी (बाहुबली हनुमान), नंदकिशोर चोपडेकर (गरुडराज), व संजय नाईक (रावण) यांना अनुक्रमे पाहिले ते पाचवे बक्षीस प्राप्त झाले.
- वेशभूषा गट (वैयक्तिक ज्युनिअर)
सेजल गावस (अंबाबाई), पर्थवी नाईक शिरोडकर (कष्टकरी), निशिकांत भोंसले (लक्ष्मी), श्रावणी सातार्डेकर (श्रीकृष्ण), व आराध्या कदम (जय हनुमान) यांना अनुक्रमे पाहिले ते पाचवे बक्षीस प्राप्त झाले.