नारायण गावस : पणजी, गोवा : चतुर्थीच्या काळात भेसळयुक्त मिठाई केलेले प्रकार मागील काही वर्षापासून सुरु आहे. त्यामुळे अन्न आणि औषधी प्रशासन खात्याने यावर आता करडी नजर ठेवली आहे. अनेक मिठाई दुकानांमध्ये हे भेसळयुक्त पदार्थ विकले जात आहेत . आता चतुर्थीला आठवडा शिल्लक असल्याने शहरातील सर्व मिठाईची दुकाने भरली आहे. पण या मिठाईच्या दुकानांवर अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करायला सुरुवात केली आहे.
चतुर्थी, दिवाळीच्या काळात मिठाइेला मागणी खूप असल्याने काही मिठाईवाले पैशाच्या माेहापायी भेसळयुक्त मिठाई तयार करतात. तसेच दुषित जागेत मिठाई बनविली जाते. या अगोदर अशी प्रकरणे समोर आली आहे. त्यामुळे अशी प्रकरणे आता पुन्हा होऊ नये यासाठी खात्याचे अधिकारी वारंवार तपासणी करत असतात. आता चतुर्थी असल्याने या अधिकाऱ्यांनी राज्यातील सर्व मिठाईच्या दुकानांची पाहणी करायला सुरुवात केली आहे.. तसेच ज्या भेसळयुक्त मिठाई विकतात आढळतात त्या दुकानदारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.मिठाईच्या माव्यात भेसळ वापरले जाते तसेच दुधामध्ये पाणी किंवा एक प्रकारचा पावडर वापरला जातो. आराेग्याला हानीकारक आहे असे पदार्थ वापरले जातात. पूर्वी असे प्रकार खूप घडायचे. यावेळी लाेकांना जास्त माहित नव्हते पण आता ग्राहकही हुशार झालेला असून या मिठाईची चव घेतल्यावर ती कशी आहे हे कळते. या मिठाईवर किती दिवस टिकते ही तारीख तसेच त्यामुळाे लोकांना कळत नाही. पण आता खात्याचे अधिकारी या सर्व मिठाईची तपासणी करत आहे. त्यामुळेअसे प्रकार कमी होत आहे.अन्न आणि औषधी प्रशासनाचे अधिकारी वर्षभर अशी पाहणी करत असतात. पण चतुर्थी दिवाळी सारख्या साणांवेळी तपासणीचा वेग वाढतो. एक महिना अगोदर सर्व मिठाई तपासणी केली जाो. जे मिठाईवाले असे भेसळयुक्त मिठाई विकतात त्याचा परवाना रद्द केेला जातो. तसेचा लोकांनी असे कुठे मिठाईवाले आढळल्यास खात्याकडे संपर्क साधावा, असे अन्न आणि औषधी प्रशासन खात्याच्या संचालिका ज्याेती सरदेसाई यांनी सांगितले.