पणजी : गोवा विधानसभेचे माजी सभापती अनंत शेट (५८) यांचे आज पहाटे गोमेकॉत अल्प आजाराने निधन झाले. गेले सात दिवस ते वैद्यकीय उपचारांसाठी गोमेकॉत दाखल होते. दुपारी त्यांच्या पार्थिवावर मयें येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.शेट हे मयें मतदारसंघातून २00७ आणि २0१२ असे दोनवेळा भाजपच्या तिकिटावर निवडून येऊन विधानसभेत गेले. १२ जानेवारी २0१६ ते १४ मार्च २0१७ या कालावधीत ते सभापती होते. २0१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट नाकारली.प्राप्त माहितीनुसार सात दिवसांपूर्वी ते बाथरुममध्ये कोसळले तेव्हा त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्तराज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शेट यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करताना त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना केली आहे.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शेट यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, शेट यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. ते तळागाळातील नेते होते. नम्र आणि शालीन स्वभावामुळे ते लोकप्रिय होते. राज्यासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि जनतेची केलेली सेवा कायम स्मरणात राहील. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनीही दु:ख व्यक्त करताना शेट यांचे राज्यासाठीचे योगदान कायम आठवणीत राहील, असे म्हटले आहे. विरोधी पक्षनेते, काँग्रेसकडूनही शोक व्यक्तविरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीही शोक व्यक्त करताना या वृत्ताने आपण सुन्न झालो, असे म्हटले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना कामत यांनी केली आहे.काँग्रेसनेही शेट यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर शोक व्यक्त करताना म्हणतात की, नम्र स्वभावाचे, साधे राहणीमान असलेले व नेहमीच सामाजिक बांधीलकीने वावरणारे व्यक्तिमत्त्व हरपले आहे.गोवा फॉरवर्डला दु:खगोवा फॉरवर्डनेही शेट यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. पक्षाचे संयुक्त सचिव संतोषकुमार सावंत म्हणतात की, ‘शेट यांच्या निधनाने एक चांगला मित्र मी गमावला. पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनीही शेट यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.
गोव्याचे माजी सभापती अनंत शेट यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 3:21 PM