सद्गुरु पाटील
बांदोडकर असे समीकरण मशीपच्या स्थापनेपासूनच झाले होते. बांदोडकरांची आज जयंती त्यांच्यावर त्यांची कन्या ज्योती बांदेकर यांनी लिहिलेले पुस्तक आज प्रकाशित होत आहे. पुस्तकात नेमके काय आहे, हे प्रकाशनानंतरच उपह होईल. मात्र ज्योती बांदेकर यांच्याशी कालच्या शुक्रवारी आम्ही लोकमतच्या पणजी कार्यालयात संवाद साधला, त्यावेळी खूप प्रश्नोत्तरे झाली. त्यातून एक कळाले की भाऊंचे जीवन, भाऊंच्या पत्नीचे योगदान, शशिकलाताईंनी त्यावेळी पुढे नेलेला राजकीय वारसा याविषयी पुस्तकात नवी माहिती वाचायला मिळेल.
मात्र ज्या भाऊंच्या काळात मंगो पक्ष स्थापन झाला होता. त्या मगो पक्षाचे यापुढील काळात भवितव्य काय, याचा उहापोह करणे हे या लेखाचे प्रयोजन आहे. मंगो पक्ष आणखी किती निवडणुकांमध्ये जिवंत राहू शकतो, तसेच यापुढेही मगो केवळ दोन-तीन एवढ्याच जागा जिंकण्यावर समाधान मानत राहणार काय, या प्रश्नांची उत्तरे अभ्यासकांना शोधावी लागतील.गोवा मुक्तीनंतर पहिली विधानसभा निवडणूक झाली तेव्हा बांदोडकर यांनी मुख्यमंत्री व्हावे असा विचार नव्हता. भाऊंचाही तसा विचार नव्हता. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवली नव्हती. मो पक्षाला त्या निवडणुकीत मोठे यश मिळाले.
पांडुरंग शिरोडकर यांनी मुख्यमंत्री व्हावे असा प्रारंभी विचार होता, पण नंतर बांदोडकरांचे नाव आले आणि भाऊच लोकप्रिय होते. भाऊ मुख्यमंत्री झाले आणि मग भाऊंसाठी एक मतदारसंघ रिकामा करून तिथे पोटनिवडणूक घेतली गेली. प्रारंभीच्या काळात म्हणजे १९६४ साली सुद्धा बांदोडकर यांच्याकडे दोन पदे होती. मंगो पक्षाचे अध्यक्षपद आणि मुख्यमंत्रीपद आज मगोचे अध्यक्षपद दीपक ढवळीकर यांच्याकडे आहे, मंत्रीपद सुदिन ढवळीकर यांच्याकडे आहे. म्हणजे दोन्ही पदे एका अर्थाने सुदिन ढवळीकर यांच्याकडेच आहेत. मगोपचे दुसरे आमदार जीत आरोलकर है मगो पक्षात असून नसल्यासारखी स्थिती आहे. भाजप नेते तथा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशीच जास्त चांगले नाते ठेवणे हे जीत यांना स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी अधिक सुरक्षित वाटते. तिच स्थिती एकूण मगो पक्षाची आहे. भाजपशी संघर्ष करण्याची आज स्थिती नाही. त्यामुळे भाजपसोबत राहणे हाच मगोपसमोर पर्याय आहे, असे आमदारांना वाटते. २०२७ साली गोवा विधानसभेची यापुढील निवडणूक होईल. २०२६ पासूनच प्रत्येक पक्ष नवी मांडणी करू लागेल. कदाचित तत्पूर्वी म्हणजे यापुढील लोकसभा निवडणूक झाल्यानंतरच भाजपकडून मंगो पक्षाला बाजूला केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपकडे आज स्वतःचेच आमदार संख्येने एवढे आहेत, की आणखी वेगळ्या पक्षाच्या आमदारांची मुख्यमंत्र्यांना गरजच नाही, येत्या लोकसभा निवडणुकीवेळी गोव्यात काय निकाल लागतो हे पाहून कदाचित भाजपचे केंद्रीय नेते पुढील धोरण ठरवतील.
म. गो. पक्षाची युती २०२२ च्या निवडणुकीवेळी तृणमूल काँग्रेससोबत झाली होती. डिचोली, फोंडा, प्रियोळ अशा मतदारसंघांमध्ये जिंकणे मगोला शक्य आहे, असे २०१२ च्या निवडणुकीत वाटले होते. मात्र तिन्ही मतदारसंघात मगोपचे उमेदवार थोडे कमी पडले. प्रियोळमध्ये गोविंद गावडे पुन्हा निवडून आले. मगोपच्या अध्यक्षांचा तिथे पुन्हा पराभव झाला. शिरोड्यात पोटनिवडणुकीवेळी चांगल्या प्रमाणात मते मिळवणारा गो पक्ष २०२२ च्या निवडणुकीत मात्र शिरोड्यात भाजपविरुद्ध निष्प्रभ ठरला. जीत आरोलकर यांच्यामुळे मांद्रे मतदारसंघ नगो पक्षाला अनेक वर्षांनंतर जिंकता आला. मडकई हा एकमेव मतदारसंघ मंगो पक्षाचा हक्काचा मतदारसंघ राहिला आहे. २०१७ ची विधानसभा निवडणूक जर खरोखर ढवळीकर यांचे पुत्र मिल यांनी लढवली तर तो मग पक्षांतर्गत नव्या राजकारणाचा आरंभ असेल. सुदिन ढवळीकर यांनी जर २०१७ च्या निवडणुकीवेळी राजकीय निवृत्ती घेणे आहीर केले तर त्यानंतरच्या काळात मंगो पक्षाचे भवितव्य काय असेल हे कुणीच सांगू शकत नाही. कारण शेवटी एक मान्य करावे लागते की सुदिन ढवळीकर यांच्या हाती मंगो पक्ष राहिल्यामुळेच हा पक्ष कायम विधानसभेत जिवंत राहिला. मगोपची वाढ झाली नाही तरी मगो पक्षाचे अस्तित्व कायम राहिले अन्यथा मगो पक्षाची स्थिती युगोपा, सेव्ह गोवा, राजीव काँग्रेस गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य काही पक्षांसारखीच झाली असती.मगोपची वाढ झाली व आमदारांची संख्या वाढली तर भाजप त्या आमदारांना पळवत असाही अनुभव नेतृत्वाला कायम घ्यावा लागला. कधी काँग्रेस तर कधी भाजपने मगो पक्षात फूट पाहून आमदार पळवले. मात्र गेल्या वीस-पंचवीस वर्षातदेखील काही नव्या राजकारण्यांना मग पक्षाचाच टिळा कपाळाला लावल्यानंतर आमदार होण्याची संधी मिळाली असे आढळून येते.
काशिनाथ जल्मी, परशुराम कोटकर, सदानंद मळीक, विष्णु प्रभु, पांडुरंग मडकईकर, लबू मामलेदार, दीपक प्रभू पाऊसकर, जीत आरोलकर अशी काही नावे उदाहरण म्हणून देता येतील. बाबू आजगावकर यांनादेखील पराभूत झाल्यानंतर पुन्हा विधानसभेत येण्यासाठी मगोपचे तिकीट घ्यावे लागले. मात्र हाच मंगो पक्ष शशिकलाताई काकोडकर यांना पुढे नेता आला नाही. रमाकांत खलपांनाही नेतृत्व पेलवले नाही. शशिकलाताईचा मये मतदारसंघात १९९९ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मग त्यांचा प्रभाव मोमध्ये राहिला नाही. खलपांबाबतही तेच घडले. खल्पांनी मगोतर्फे जिंकून आल्यानंतर मग आमदार असताना तो पक्ष कायमचाच सोडला. शेवटी पक्ष चालविण्यासाठीही हाती निधी असण्याची व असला तर तो खर्च करण्याची तयारी असावी लागते. मगोपच्या पूर्वीच्या अनेक नेत्यांना हे जमले नाही. ढवळीकर यांना जमल्यामुळे मगो पक्ष शिल्लक राहिला. अन्यथा भाजपने तो कधीच विलीन करून घेतला असता.
भाऊसाहेब बांदोडकरांकडे मो पक्ष होता तेव्हा देखील भाऊंविरुद्ध मगोत बंड होत होती. भाऊ मुख्यमंत्रिपदी असताना मगोपचेच काही आमदार विरोधाची भूमिका घेत होते. पक्षाचे लोकशाहीकरण करा अशी मागणी काही आमदार करत होते. १९६५ साली शंभू पालयेकर व दत्ताराम देसाई यांनी भाऊंविरोधात भूमिका घेतली होती. पां. पुं. शिरोडकर, मुकुंद शिक, नारायण नाईक आदी काहीजणांनी मार्च १९६६ मध्ये बांदोडकरांची कोडी करण्याचा मोठा प्रयत्न केला होता, असा संदर्भ पराग द. परब यांच्या पुस्तकात (भारताची पहिली लोकसत्ताक क्रांती सापडतो. जनमत कौलावेळी भाऊंच्या भूमिकेचा पराभव झाला तरी बांदोडकर यांची लोकप्रियता मुळीच आटली नव्हती. त्यामुळेच मार्च ६७ मध्ये झालेली दुसरी विधानसभा निवडणूकही भाऊंच्या नेतृत्वाखाली मगो पक्ष जिंकला होता. तेव्हा मंत्रिमंडळे ही तीन सदस्यांचीच असायची, हे वेगळे सांगायला नको. १९७३ मध्ये भाऊंचे निधन झाले. भाऊ आणखी दहा-बारा वर्षे जगले असते आणि सत्तेत राहिले असते तर गोव्याचे राजकीय व सामाजिक भवितव्य खूप वेगळे दिसले असते, असे म्हणायला खूप वाव आहे. भाऊंनंतर शशिकला काकोडकर यांनी सरकार चालवले, पण त्यांच्या विरोधातही बंड झाले. सत्ता गेली. ममोपचा वैभवाचा काळ संपुष्टात येण्यास १९७८ सालानंतर आरंभ झाला. १९९६ साली मगोपचा खासदार केंद्रात कायदा राज्यमंत्री झाला होता, ही एक समाधानाची गोष्ट. मात्र त्यानंतर मंगो पक्षाला पुन्हा कधीच लोकसभा निवडणूक जिंकता आली नाही. यावेळच्या लोकसभा निवडणुकीवेळी तर मगो पक्षाचे उमेदवार रिंगणात नसतील. कारण मंगो पक्ष भाजपसोबत आहे.
एक-दोन मतदारसंघ वगळता मगोपची आता कुठेच संघटनात्मक व्यवस्था नाही. संघटनात्मक बांधणी नाही. आमदारांचे किंवा पराभूत उमेदवारांचे समर्थक हेच मगो पक्षाचे कार्यकर्ते आहेत. मडकई प्रियोळ, मांद्रे, डिचोली, पेडणे, फोडा अशा महा-सात ठिकाणी मगोपचे कार्यकर्त दिसून येतात. गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या गोपच्या उमेदवारांना २०२७ च्या निवडणुकीपर्यंत तरी पक्षात महत्त्व येणार नाही. तूर्त जैसे थे स्थितीत राहावे ही मगोपची भूमिका आहे. मध्य राहून दिवस काढायचे असे मत्र पक्षाने ठरवले आहे. भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव मोपा येथील विमानतळाला द्यावे अशी मागणी मगोपच्या केंद्रीय समितीने केली होती. मात्र केंद्रातील भाजपने ती ऐकली नाही. हिंदू बहुजन समाजाला आपला वाटेल असा एकही प्रादेशिक पक्ष आता गोव्यात नाही. मंगो पक्ष हाच अजून काही मतदारसंघांतील हिंदू बहुजनांना आपला वाटतो. मात्र पूर्ण गोव्यात आपला प्रभाव टाकू शकेल, लोकांना आकर्षित करू शकेल असे नेतृत्व आता मगोकडे नाही, भाऊंसारखे लोकप्रिय नेतृत्व काही प्रमाणात शशिकला काकोडकर व रमाकांत खलप यांनी एकेकाळी निर्माण केले होते.
आता तो काळ संपला आहे. मंगो पक्षाचे भवितव्य कदाचित २०२७ च्याच निवडणूक काय ते कळून येईल. आजचा भाजप हा एवढा आक्रमक आहे की, तो दुसरा हिंदुत्ववादी पक्ष जास्त वाढणार नाही याची काळजी घेतो. देशभरच हे घडतेय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची काय गत झाली ते महाराष्ट्रात पाहायला मिळते. भाऊंचा मंगो पक्ष जर आज अत्यंत प्रभावी असता तर त्याची गत देखील भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेसारखी करून ठेवली गेली असती हे वेगळे सांगायला नको.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"