शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 6:16 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला शोक

पणजी : गोव्याच्या माजी राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा (७७) यांचे काल बुधवारी दुःखद निधन झाले. ऑगस्ट २०१४  ऑक्टोबर २०१९ अशी तब्बल पाच वर्षे आणि दोन महिने मृदुलाजी गोव्याच्या राज्यपालपदी राहिल्या.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. श्रीमती मृदुलाजी यांच्या निधनावर शहा यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. भाजपसाठी तसेच साहित्य क्षेत्रासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, असे शहा यांनी म्हटले आहे.

मातृतुल्य व्यक्तिमत्व हरपले; मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्तमुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी मृदुलाजी यांच्या निधनाने आपल्याला धक्काच बसल्याचे नमूद करून दुःख व्यक्त करताना त्या आपल्याला मातेसमान होत्या, असे म्हटले आहे. मृदुलाजी कला व साहित्याच्या भोक्त्या होत्या. तळागळात त्यांचे कार्य होते तसेच त्या उत्तुंग नेत्या होत्या. त्यांच्या निधनाने देशाची फार मोठी हानी झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. 

उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनीही मृदुलाजी यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. त्या शांत व मृदूभाषी होत्या. त्यांच्या गोव्यातील वास्तव्यात नेहमीच  संबंध चांगले राहिले, असे कवळेकर म्हणतात.