पणजी : गोव्याचे माजी खासदार, माजी शिक्षण मंत्री, सिध्दहस्त लेखक आणि मराठी भाषा व संस्कृतीचे जाज्वल्य अभिमानी प्राध्यापक गोपाळराव मयेकर यांचे गुरूवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले.मयेकर हे गोमंतक मराठी अकादमीचे माजी अध्यक्ष होत. ते लोभस व प्रासादिक शब्दकळा लाभलेले कवी होते. मज दान असे हे पडले हे त्यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रसिद्ध आहे.१९८९ साली ते महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले होते. तत्पूर्वी ७० च्या दशकात ते गोव्यात आमदार व शिक्षण मंत्री होते. विद्वान साहित्यिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक, तेजस्वी वक्ता अशी त्यांची गोवा व महाराष्ट्राला ओळख होती. त्यांचे बालपण मुंबई त गेले होते. गोव्यात म्हापसा येथे ते रहायचे. मृत्यूसमयी वय ८७ होते.
गोव्याचे माजी खासदार गोपाळराव मयेकर निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 11:17 PM