शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

उपचार पूर्ण करुन माजी मंत्री अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोजा बुधवारी गोव्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 6:52 PM

मागील दोन महिन्यापासून अमेरिकेत उपचार घेत असलेले माजी मंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा आपला उपचार पूर्ण करुन बुधवारी गोव्यात दाखल होणार आहेत. 

म्हापसा - मागील दोन महिन्यापासून अमेरिकेत उपचार घेत असलेले माजी मंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा आपला उपचार पूर्ण करुन बुधवारी गोव्यात दाखल होणार आहेत. 

मागील दोन महिन्याहून जास्त काळ ते अमेरिकेत उपचार घेत होते. २० आॅगस्ट रोजी राज्यातील मंत्रीपदी असताना ते उपचारासाठी अमेरिकेत गेले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांना मंत्रीमंडळातून वगळण्यात आले होते. आपल्याला विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याचे व्यक्तव्य करुन त्यांनी त्यावर आपली स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. 

बºयाच काळापासून आजारी असलेले डिसोझा हे जुलै महिन्यात पहिल्यांदा उपचारासाठी मुंबईत गेले होते. त्यावेळी त्यांचा तेथे काही चाचण्या घेण्यात आलेल्या. मुंबईतील चाचण्या पूर्ण झाल्यानंतर १ आॅगस्ट रोजी पुन्हा गोव्यात दाखल झाले होते. त्यानंतर पुन्हा मुंबईला जावून  ९ आॅगस्टला पुन्हा गोव्यात आले होते. मुंबईतील डॉक्टरांनी उपचारा दरम्यान दिलेल्या सल्ल्यानुसार पुढील उपचार घेण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडून अमेरिकेत जाण्यासाठी अधिकृत परवानगी घेवून पुढील उपचारासाठी २० आॅगस्टला रवाना झाले होते. त्यावेळी त्यांच्या समवेत डिसोझा यांची पत्नी तसेच मुलगा अमेरिकेत गेले होते. याच कालावधीत सुरु असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात ते आरोग्याच्या कारणास्तव सहभागी होवू शकले नव्हते. 

त्यांच्यावर सुरु असलेले उपचार १० आॅक्टोबरला पूर्ण झाले होते. त्यानंतर १७ आॅक्टोबर रोजी त्यांच्या शरीराची स्कॅनद्वारे पूर्ण चाचणी घेण्यात आलेली. केलेल्या चाचणीचा अहवाल आल्यानंतर मंगळवारी अमेरिकेतून मुंबईला येण्यासाठी निघाले आहेत. बुधवारी मुंबईवरुन ते गोव्यात परतण्याची संभावना आहे. अमेरिकेत जाताना मंत्री असलेले डिसोझा पुन्हा गोव्यात दाखल होताना मात्र फक्त आमदार या नात्याने येणार आहेत. नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री ते अमेरिकेहून निघणार असून बुधवारी संध्याकाळी मुंबईत पोहचण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याच दिवशी रात्री किंवा गुरुवारी सकाळी गोव्यात दाखल होण्याची संभावना आहे. 

टॅग्स :goaगोवा