पणजी : येत्या ६ फेब्रुवारी रोजी गोवा भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी चार वेगवेगळ्या सरकारी प्रकल्पांचे उद्घाटन आणि तीन प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेची माहिती दिली.
भारतीय ऊर्जा सप्ताहाचे उद्घाटन करण्यासाठी मोदीजी गोव्यात येत आहेत. मी बेतूल येथे हा कार्यक्रम झाल्यानंतर ते मडगाव येथे जाहीर सभेत संबोधित करणार आहेत. कुंकळ्ळी येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दोनापॉल येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स, बेती येथील आयएनएस मांडवी नेव्हल वॉर कॉलेजचे नवीन कॅम्पस आणि कुडचडे येथील एकात्मिक कचरा व्यवस्थापन सुविधा या चार प्रकल्पांचे उद्घाटन मोदीजी मडगाव येथून वर्चुअल पद्धतीने करणार आहेत.
तसेच रेइश मागुश येथे पीपीपी तत्वावर यू रोपवे प्रकल्प, पाटो, पणजी येथे थ्री डी-प्रिंटेड इमारत आणि शेळपें, साळावली येथे १०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाची पायाभरणी मोदींच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीनेच होणार आहे.