शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

चार वर्षांत पंतप्रधान मोदींनी केले 41 विदेश दौरे, गिनीज बुकमध्ये नाव नोंदवा, काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 8:00 PM

गेल्या चार वर्षांच्या काळात ४१ विदेश दौरे करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात यावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसने केली आहे.

पणजी : गेल्या चार वर्षांच्या काळात ४१ विदेश दौरे करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात यावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसने केली आहे. ५२ राष्ट्रांमध्ये त्यांनी केलेल्या या दौऱ्यांवर ३५५ कोटी ३0 लाख ३८ हजार २६५ रुपये खर्च झाले. आजवर कुठल्याही पंतप्रधानाने एवढे विदेश दौरे केले नाहीत. मोदी यांनी गेल्या चार वर्षात तब्बल १६५ दिवस विदेश दौ-यांवर घालवल्याचा आरोपही आरटीआय माहितीचा हवाला देऊन काँग्रेसने केला आहे.पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संकल्प आमोणकर यांनी याबाबत आपण लंडनला गिनीज वर्ल्ड रिकॉर्डच्या कार्यालयाला पत्र लिहून विनंती केली असल्याचे सांगितले. पंतप्रधानांच्या या घाऊक विदेश दौ-यांवर त्यांनी टीका केली. आमोणकर म्हणाले की, रुपयाचे अवमूल्यन झालेले मोदी यांनी पंतप्रधान बनण्यापूर्वी रुपयाचे वाढविण्यासाठी प्रयत्य करणार असल्याचे जाहीर केले होते. त्या केवळ वल्गनाच ठरल्या, अशी टीकाही आमोणकर यांनी केली. मोदी यांच्या दौ-याची माहिती बंगळुरु येथील काँग्रेसच्या एका हितचिंतकाने आरटीआय अर्जातून मिळविली असल्याचे त्यांनी सांगितले.पक्षाच्या महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांच्यावर पॅरा शिक्षक आंदोलन प्रकरणात गुन्हा नोंदवून तसेच नेत्रावळीच्या अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात नावाची वाच्यता केल्याचा आरोप ठेवून छळ चालला असल्याचा आरोप आमोणकर यांनी केला. आवाज दाबण्यासाठी खोटे गुन्ह्यांमध्ये अडकविले जात आहे, असे ते म्हणाले.पक्षाचे अन्य एक प्रवक्ते ऊर्फ मुल्ला यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर त्यांचेच सहकारी मंत्री गोविंद गावडे आणि जयेश साळगावकर हे निष्क्रियतेचा आरोप करीत असल्याकडे लक्ष वेधताना ढवळीकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. २४ तास पिण्याचे पाणी देण्याचे आश्वासन हवेत विरले आहे. सासष्टी तसेच इतर भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. मेरशी, सांताक्रूझ येथे २ हजार लिटरची टाकी बांधली. त्यावर तब्बल २ कोटी रुपये खर्च केले. परंतु या टाकीचा उपयोग होत नाही. चिंबल, मेरशीला पाण्याची टंचाई आहे. नावेलकर रेसिडेन्सीमध्ये लोकांना पिण्याचे पाणी नाही. २ लाख लिटरची टाकी तेथे विनावापर आहे. लोकांना टँकरने पाणी मागवावे लागते. पक्षाचे पदाधिकारी विठू मोरजकर म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणात भाजप पदाधिका-यांविरुद्ध म्हापसा तसेच पणजी पोलीस स्थानकांमध्ये तक्रार नोंदवूनही पोलिसांकडून काही कारवाई झालेली नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी