लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : यापूर्वी विद्यार्थ्यांना खासगी बस करुन सहलीला जावे लागत होते. पण आता सरकारने सर्व सरकारी शाळांना कंदब महामंळाच्या बसेस दिल्या आहेत.
त्यामुळे आता सरकारी शाळा आपल्या विद्यार्थ्यांना कदंब बसने सहल घडवून आणणे सोपे झाले आहे. त्यामुळे शाळांना आता खासगी बसची अडचण भासत नाही. खासगी बस केल्यावर शिक्षकांना मोठी जबाबदारी येतेच. पण वाहन चालकालाची याची माहिती देण्याची गरज आहे.
सहलीची जबाबदारी सामूहिक
सहलीच्या बसला अपघात झाला तर जबाबदार कोण हा प्रश्न सध्या सर्वांना पडत आहे. याची जबाबदारी त्या शाळेच्या मुख्याध्यापकांपासून सर्व संबंधित घटकांची जबाबदारी आहे. त्यामुळे मुलांना सहलीचा नेण्यात येणाऱ्या बसचा अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोणा एका व्यक्तीवर कशी येणार असा प्रश्न असतो. त्यामुळे सहलीला जाण्याअगोदर शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी, पालकांची परवानगी महत्वाची ठरते.
असे असते जबाबदारीचे स्वरुप
मुख्याध्यापकांनी शिक्षकांना ही जबाबदारी दिलेले असते. तसेच मुख्याध्यापकांनी बसची तपासणी करावी लागते. तसेच चालकांची योग्य ती तपासणी करावी लागते. काही चालक दारु पिऊन गाडी चालवित असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका अद्भवू शकतो. या सर्वांची जबाबदारी मुख्याध्यापकांना घ्यावी लागते.
सहलीसाठी काय आवश्यक
सहलीसाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. यासाठी सर्व प्रथम शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र घेणे गरजेचे असते. तसेच शिक्षणाधिकाऱ्यांकडून परवानगी आवश्यक असते. विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जातात त्यांना पुन्हा त्यांच्या घरी सुरक्षित पोहचविणे ही शिक्षकांची जबाबदारी असते. त्यामुळे शिक्षक मुलांना सहलीला घेऊन जाताना त्यांना असे असुरिक्षित ठिकाणी न सोडता त्यांची पूर्ण देखभाल करावी लागते.