शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

मिशन बायपाससाठी मोर्चा

By admin | Published: May 28, 2016 2:37 AM

पणजी : खनिज वाहतुकीमुळे केपे, सांगे भागात अपघातांचे सत्र सुरूच झाल्याने २०१२ साली उगे येथे तत्कालीन मुख्यमंत्री

पणजी : खनिज वाहतुकीमुळे केपे, सांगे भागात अपघातांचे सत्र सुरूच झाल्याने २०१२ साली उगे येथे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पायाभरणी केलेल्या बगलरस्त्याचे काम पूर्ण करावे, या मागणीसाठी केपे व सांगेतील नागरिकांनी शुक्रवारी येथे मोर्चा काढला. त्यानंतर आझाद मैदानावर झालेल्या सभेत खनिज व्यवसायप्रश्नी गोवा फाउंडेशनने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेत मिशन बायपासच्या वतीने येत्या दोन आठवड्यांत हस्तक्षेप याचिका सादर करण्यात येईल, असा इशारा या वेळी आंदोलकांनी दिला. २०१२ मध्ये उगे येथे खनिज व्यवसायासाठी वेगळ्या बगलरस्त्याची पायाभरणी केली होती. सुमारे अर्धा किलोमीटर रस्ता बांधण्यात आला होता. मात्र, नंतर ते काम तसेच ठेवण्यात आले. त्या पायभरणीच्या दगडाच्या प्रतिमेला आंदोलकांनी फुलांचा हार घालून श्रध्दांजली वाहिली. तसेच पणजी बसस्थानक ते आझाद मैदानपर्यंत मोर्चा काढला. या मोर्चात महिला व लहान मुलेही सहभागी झाली होती. आंदोलकांनी या वेळी ‘विकास नाका हाय क्लास, पयली करात बायपास’ अशा घोषणा दिल्या. या वेळी इतिहासतज्ज्ञ प्रजल साखरदांडे, शिक्षक मिनिन फर्नांडिस, मिशन बायपासचे निमंत्रक प्रदीप काकोडकर आदी मान्यवर उपस्थित होते. २००८ पासून आम्ही हे मिशन बायपास आंदोलन छेडले आहे. आतापर्यंत सरकारला भरपूर मुदत दिली आहे. आता आणखी थांबणार नाही, असे प्रदीप काकोडकर यांनी सांगितले. शेकडो लोकांचा बळी या खनिज वाहतुकीमुळे गेला आहे. खनिज व्यवसाय सुरू करण्यापूर्वी सरकारने पूरक साधनसुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत. हे सरकार फक्त खजिन व्यावसायिक लॉबीचाच विचार करत आहे, असा आरोप त्यांनी केला. हा बगलरस्ता लोकांच्या पैशातून नव्हे तर खनिज व्यावसायिकांकडून पैसे घेऊन बांधण्यात यावा. नाही तर या रस्त्यासाठी खनिज वाहतूक करणाऱ्यांना टोल लावून निधी उभा करावा, असे काकोडकर म्हणाले. सरकारची आशा वाढली असून या सरकारला फक्त खनिज व्यावसायिकांचे पडले आहे. सामान्य लोकांचा विचार हे सरकार करीत नाही. किती तरी लोकांचे प्राण या वाहतुकीमुळे गेले आहेत. मात्र, सरकारला लोकांच्या जीवनाचे पडलेले नाही. आमची सहनशीलता संपली असून आम्ही आणखी बळी जाऊ देणार नाही, असे काकोडकर यांनी सांगितले. आणखी किती मरणांची हे सरकार वाट बघणार, असा प्रश्न मार्टिन्स फर्नांडिस यांनी केला. लोकांचे प्राण आणखी संकटात न टाकता या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)