शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

गोव्याला जुगाराची मगरमिठी, नागरिकांमध्ये संताप; कॅसिनो माफियांचा थयथयाट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 9:07 AM

दादर, शिवाजी पार्क, माहिममध्ये ६४० बळी

नरेश डोंगरे / आशिष रॉय

पणजी (गोवा) : पैशासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी ठेवून तेरा वर्षांपूर्वी गोव्यात अवतरलेल्या कॅसिनो माफियांनी आता संपूर्ण राज्याला मगरमिठी मारली आहे. पणजीची शान असलेल्या मांडवी नदीवर कॅसिनो माफियांनी अक्षरश उच्छाद मांडल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथील जनजीवनावर विपरीत परिणाम झाला आहेच जनजीवनही पुरते बिघडून गेले आहे. या माफियांवर सरकारी यंत्रणांकडून कठोर कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. 

ब्रिटिशांनी व्यापाराच्या बहाण्याने चोरपावलांनी भारतात प्रवेश केला आणि नंतर संपूर्ण देशच गिळंकृत केला होता. त्याचाच कित्ता कॅसिनो माफियांनी गोव्यात गिरविला आहे. खानपान आणि मनोरंजनाच्या नावाखाली १३ वर्षांपूर्वी कॅसिनो गोव्यात आला. नंतर हळूच एकाचे दोन, दोनाचे चार, चाराचे सहा होत गेले. आजच्या घडीला गोवा-पणजीत एकूण २६ कॅसिनो सुरू आहेत. सहा कॅसिनो पणजीच्या मांडवी नदीच्या पात्रात आहेत. डेल्टिन जॅक, बिग डॅडी, मॅजेस्टिक प्राईड, कॅसिनो प्राइडसह अशा नावांनी सहा जहाजांमध्ये हे कॅसिनो थाटले आहेत. या कॅसिनो कम जहाजांवर अत्यंत आकर्षक आणि नेत्रदीपक अशी रोषणाई केली आहे.

भररस्त्यात ‘कॅसिनो जाना है क्या’  अंधार पडू लागताच ही रोषणाई भुरळ घालू लागते. कॅसिनो माफियांचे एजंट तुमच्यापर्यंत पोहचू लागतात. त्यांचे नेटवर्क गोव्याचे विमानतळ, बस-स्थानकापासून रस्त्या-रस्त्यात दिसून येते. रस्त्यावरच जागोजागी एजंट लोकांना ‘कॅसिनो जाना है क्या’, अशी विचारणा करतात. त्याच्या हातात जुगार खेळण्याचे मोफत कूपन ठेवतात. एन्ट्री फीमध्येच अनलिमिटेड दारू, जेवण आणि डान्सची मजा घेता येईल, असे पटवून दिले जाते व खेळ सुरू होतो.

एन्ट्री फीच्या नावावर मनमानी वसुलीमांडवीच्या किनाऱ्यावर फुटपाथलगत कॅसिनो चालकांनी पॉश कार्यालये थाटली आहेत. इथे कूपन दाखवून एन्ट्री फीची विचारणा करणाऱ्याकडून दोन हजारापासून साडेतीन हजार रुपयांपर्यंत (मनात येईल त्याप्रमाणे) एंट्री फी घेतली जाते. त्यानंतर ग्राहकाच्या हातावर विशिष्ट बँड बांधले जातात. ते बँड पाहूनच बाउन्सर ग्राहकाला प्रवेश देतो. आत खाणे-पिणे आणि कूपनच्या माध्यमातून मोफत जुगार खेळवण्याचा डाव दिला जातो. 

(पुढच्या भागात... अंतर्गत झगमगाट, तोकड्या कपड्यातील बाला अन् खिशाचा खुलतो ताला) 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा