शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

गांधी जयंती सुटीचे गौडबंगाल!

By admin | Published: March 16, 2015 1:38 AM

पणजी : गोवा सरकारने महात्मा गांधी जयंतीची २ आॅक्टोबरची सुटी सरकारी सुट्यांच्या यादीतून वगळल्याच्या वृत्ताने रविवारी

पणजी : गोवा सरकारने महात्मा गांधी जयंतीची २ आॅक्टोबरची सुटी सरकारी सुट्यांच्या यादीतून वगळल्याच्या वृत्ताने रविवारी खळबळ माजली. वाद चिघळण्याची चिन्हे दिसताच, गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर या मुद्द्यावर सारवासारव करताना दिसले. हे कृत्य ‘खोडसाळपणा’ वा ‘ टंकलेखन दोष’ असू शकतो, असे ते म्हणाले. गोवा सरकारच्या शनिवारी जाहीर केलेल्या या वर्षीच्या शासकीय सुट्यांमधून महात्मा गांधी जयंतीला वगळल्याचे वृत्त आले. विशेष म्हणजे ब्रिटनमध्ये महात्मा गांधींच्या भव्य पुतळ्याचे अनावरण झाले, नेमक्या त्याच दिवशी ही घटना घडली. काँग्रेसने गोवा सरकारच्या या कृत्याला जोरदार विरोध केला आहे. गांधी जयंतीला सार्वजनिक सुट्यांच्या यादीतून वगळणे हा राष्ट्रपित्याचा अपमान आहे. भाजप सरकारच्या कथनी आणि करणीत फरक असल्याचा आरोप यानिमित्ताने काँगे्रसने केला. देशभरातून याचे पडसाद उमटले; परंतु २४ तासांतच सरकारने सुटी रद्द केलेली नाही आणि तसा प्रस्तावही नसल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले. या संदर्भात मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि प्रकरणावर पडदा टाकला. सुटी रद्द करण्याचा प्रस्ताव नाहीच तसेच सरकारी कॅलेंडरमध्ये ही सुटी अधिकृतरीत्या दाखवल्याचे सरकारने स्पष्ट केले. काँग्रेसचे राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप सरकारचा निषेध केला. महात्मा गांधीजींबद्दल अलीकडे आदर दाखवणारे भाजप नेते आपल्या मुळावर गेले, अशी टीका त्यांनी केली. स्वच्छ भारत मोहीम राबवायची आणि दुसरीकडे असा अनादर करायचा हे योग्य नव्हे. हा विषय सोमवारी राज्यसभेत मांडणार असल्याचे ते म्हणाले. अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी ब्रिटनमध्ये गांधीजींचा पुतळा उभारल्याच्या घटनेचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले, की हा पुतळा बसविल्याबद्दल एकीकडे केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी ब्रिटिश सरकारची तोंडभरून स्तुती केली. ही ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय आदरांजली, असेही म्हटले. दुसरीकडे गोव्यात मात्र उलटेच घडते आहे. हा भाजपचा राष्ट्रवाद की सौजन्य? (प्रतिनिधी)