-सूरज पवार
मडगाव - महिन्याभरापूर्वी गोव्यात खळबळ माजवून देणा-या बेताळभाटी येथील गँगरेप प्रकरणात संशयिताचे मोबाईलवरुन संभाषण पृथ्थकरणासाठी चंदीगढ येथे पाठवून देण्यात आले आहे. सीएफएसएल चंदीगड येथे प्रयोगशाळेत या व्हॉईस सँपलची तपासणी होणार आहे. पोलिसांचे एक पथक चंदिगडला रवाना झाले आहे. दरम्यान, संशयिताच्या डीएनए चाचणीचे नमुने तेथे प्रयोगशाळेत पाठवून देण्यात आले असून, पोलिसांचे एक पथक हैदराबाद येथे रवाना झाले आहे. या गँगरेप प्रकरणात संशयितावर लवकरच आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील बेताळभाटी येथील सनसेट बीचवर गँगरेपची ही घटना 23 मे रोजी घडली होती. मध्यप्रदेशातील इंदुर येथील तिघा पर्यटकांनी एका युवतीवर बलात्कार करुन नंतर त्या युवतीसह तिच्या मित्रचे कपडे उतरवून नग्नावस्थेत त्यांची मोबाईलवरुन छायाचित्रे काढली होती. फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली होती. मागाहून त्या युवतीने गोव्यातील कोलवा पोलीस ठाण्यात यासंबधी रितसर तक्रार नोंदविली होती. संशयितांनी त्या युवतीच्या मित्रला खंडणीसाठी मोबाईलवरुन कॉल केला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा कौशल्यरित्या तपास करताना ईश्वर मकवाना, संजय पाल व राम संतोष भारिया या तिघांना अटक केली होती. सदया संशयितांची गोव्यातील कोलवाळ तुरुगांत रवानगी करण्यात आली आहे. ईश्वर मकवाना हा कुविख्यात गुन्हेगार असल्याचे मागाहून उघड झाले होते. इंदुर येथे त्याच्यावर गँगरेप, खंडणी, दुहेरी खून असे गुन्हे नोंद आहेत. ईश्वर वापर असलेले मोबाईल संच चोरीचे असून, इंदुर पोलीस ठाण्यात यासबंधी तक्रारही नोंद आहे.