लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गती शक्ती पथकाने गोव्यासाठी गती शक्ती मास्टर प्लॅन तयार करून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे सादर केला.
मुख्यमंत्र्यांनी या पथकाची बैठक घेतली. वेर्णा औद्योगिक वसाहत टप्पा ३. संजीवनी सहकारी साखर कारखाना पुनर्विकास, धारबांदोडा येथील ट्रक टर्मिनस, दोनापावला येथील आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर आणि मच्छिमारी प्रकल्पाचा पुनर्विकास यांसारख्या राज्य मास्टर प्लॅनमध्ये समाविष्ट असलेल्या पाच पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीवर चर्चा करण्यात बैठकीत चर्चा करण्यात आली.
रस्ते, रेल्वे, बंदरे, जलमार्ग, विमानतळ, व्यापक वाहतूक सुविधा, लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधा, भारतमाला, सागरमाला, अंतर्गत जलमार्ग, आदी गोष्टींचा समावेश असलेल्या मास्टर प्लॅनच्या अंमलबजावणीसंबंधी विविध पैलूंवर बैठकीत चर्चा करण्यात आली.