पणजी : शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्य सरकारच्या शिक्षण खात्याकडून नऊ शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार प्रदान करुन सन्मान करण्यात आले. 5 सप्टेंबर हा दिवस माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णनन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन म्हणून पाळला जातो. याचे औचित्य साधून हा पुरस्कार सोहळा बुधवारी पणजीतील कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर सभागृहात पार पडला. यावेळी प्रधान सचिव धमेंद्र शर्मा, शिक्षण सचिव नीला मोहनन व शिक्षण संचालक गजानन भट हे व्यासपीठावर उपस्थित होते. धमेंद्र शर्मा यांच्या हस्ते या नऊही शिक्षकांचा मानपत्र व गुलाबगुच्छ देऊन सत्कार केला गेला.
या शिक्षकांचा झाला गौरवबेतोडा-ताल-फोंडा येथील सरकारी प्राथमिक शाळेचे शिक्षक संभाजी राऊत, मडगावाच्या महिला व नूतन हायस्कुलच्या सहाय्यक शिक्षिका श्वेता सुहास प्रभुदेसाई, मुख्याध्यापक विभागात पेडणे तालुक्यातील मांद्रे येथील सप्तेश्वर इन्स्टिट्यूट फॉर हायर एज्युकेशनचे मुख्याध्यापक रामदास केळकर, हेडलॅण्ड सडा-वास्को येथील दिपविहार हायस्कुलच्या सहाय्यक शिक्षिका विल्मा परैरा, इब्रामपूर-पेडणे येथील सातेरी विद्यामंदिराचे सहाय्यक शिक्षक सुभाष सावंत, डिचोली येथील श्री शांतादुर्गा हायस्कुलचे सहाय्यक गजानन शेट्ये, निरंकाल-फोंडा येथील गणानाथ इंग्लिश हायस्कुलचे मुख्याध्यापक गिरीश तेंडुलकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य देविदास कुडव, मडगावच्या लोयोला उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका कोरा कुएल्हो आब्रियू या शिक्षकांचा विद्यादान क्षेत्रात मौलाचा वाटा उचल्याने राज्य शिक्षक पुरस्कार देऊन गौरव सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या संदेशाचे वाचनमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारी असल्याने सध्या ते अमेरिकेत उपचार घेत आहेत. त्यामुळे ते या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाही. मात्र, त्यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन आपला संदेश पाठवून दिला होता. त्यांचे ओएसडी सीताराम नाईक यांनी हा संदेश सभागृहात वाचून दाखविला.
सन्मानित शिक्षक काय म्हणाले...- शिक्षक संभाजी राऊत म्हणाले, आतापर्यंत मिळालेल्या चांगले व वाईट अनुभवांचा उजाळा या पुरस्काराने मिळाला. ३४ वर्षांपूर्वी मी धनगर वस्तीत मी पहिल्यांदा रुजू झालो, त्या वेळी एक विचार मनात आला होता. शहरी भागातील पालक पाल्यांना योग्यप्रकारे मार्गदर्शन करून शिकवणी वर्गाला पाठवताना दिसायचे. मात्र ग्रामीण क्षेत्रात या सुविधांचा अभाव दिसून येत होता. तेव्हा या क्षेत्रात काहीतरी विद्यार्थ्यांसाठी करावे ही इच्छा बाळगून माझ्या अद्यापन करिअरला सुरुवात केली. केवळ शाळेच्या वेळेत विद्यादानाचे कार्य होत नाही. शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविण्यासाठी सर्व शिक्षकांनी चिंतन करावे, असे आवाहन त्यांनी केली. - शिक्षिका विल्मा परैरा म्हणाल्या, हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते. पुरस्कारासाठी मी काम केले नाही. विद्यादान हे क्षेत्र मी आवडीने निवडले व त्याच अनुषंगाने आजवर कामही केले. प्रत्येक दिवस वेगळा अनुभव देत आला आहे. हा पुरस्कार माझा नसून माझ्या प्रत्येक विद्यार्थी, सहकारी व व्यवस्थापनाचा आहे, ज्यांच्यामुळे मला या पुरस्काराने सन्मानित केले गेले. त्यांना हा पुरस्कार मी समर्पित करते. दरम्यान, मुख्याध्यापक रामदास केळकर व मुख्याध्यापक गिरीश तेंडुलकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
एक नजर...१) महात्मा गांधी यांचे मार्गदर्शन करून देणाºया ‘नयी तालीम’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन. या पुस्तकाचे लोकार्पण देशात ४ सप्टेंबरला झाले होते. राज्य शिक्षण आणि संशोधन प्रकाशक मंडळाचे नागराज होन्नीकई यांच्याकडून पुस्तकाविषयी माहिती. या वेळी पी. वानी व श्रुती एस. कुमार यांची उपस्थिती. या पुस्तकातून विद्यार्थी, शिक्षकांना प्रेरणा मिळेल व ही एक राष्टीय चळवळ असल्याचे होन्नीकई म्हणाले. ३) नीला मोहनन यांनीही मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, प्रामाणिकपणे काम करणाºयांना शिक्षकांच्या कार्याला पोचपावती म्हणून हा सन्मान दिला जातो. शिक्षण क्षेत्रात अनेक आव्हाने असतात. तरी शिक्षक याला सामोरे जात, विद्यार्थ्यांना घडवितो. शिक्षण ही देवाण-घेवाण प्रक्रिया असते. शिक्षणात तंत्रज्ञानाचा वावर वाढल्याने शिक्षकांची जबाबदारी व भूमिका वाढली आहे. स्वत:साठी विचार करायला लावणारा खरा शिक्षक असतो.४) दिपप्रज्वलाने कार्यक्रमाचे उद्घाटन. या वेळी गजानन भट यांनी दोघां विद्यार्थ्यांना व्यासपीठावर बोलवून दिपप्रज्वलन करण्याची संधी दिली.५) दरवर्षी प्रत्येक तालुक्यातून शिक्षण क्षेत्रातून निधी गोळा केला जातो. हा निधी त्यांच्या कुटुंबियांच्या विकासाठी उपयोग केला जातो. यंदा याचे पहिले बक्षिस बार्देस तालुक्याला मिळाले. दुसरे बक्षिस डिचोली तालुका. तर तिसरे बक्षिस सत्तरी तालुका. या वेळी संबंधित प्रतिनीधीनी येऊन हा पुरस्कार स्वीकाराला.
देशाच्या विकासाठी शैक्षणिक पायाच महत्त्वाचाधमेंद्र शर्मा म्हणाले, शिक्षणाप्रती जी निष्ठा या गोव्यात दिसते, ती वाखण्याजोगी आहे. शैक्षणिक पाया नसल्याशिवाय कोणताही देशाचा विकास किंवा समाज महान होऊ शकत नाही. बुद्धि व मानसिकता या दोन्ही गोष्टी उच्च असल्या पाहिजे. याची विद्यार्थ्यांमध्य योग्य सांगड घालून देण्याचे शिक्षकवर्ग करतो. विज्ञान व गणित या दोन गोष्टी प्रगतीसाठी मौलाचे काम करतात. मात्र, अलिकडे विद्यार्थ्यांची या विषयांकडे रूची कमी होताना दिसते. ही चिंतेची बाब. त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रधान सचिव धमेंद्र शर्मा यांनी केले.