बोगद्यातून कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात गाेमंतकीय इंजिनियर्सचाही हातभार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 01:49 PM2023-11-30T13:49:37+5:302023-11-30T13:54:30+5:30
फोंड्यातील अमोघ गुडेकार आणि उसगावातील आसिफ मुल्लांचा सहभाग
नारायण गावस, पणजी-गोवा: उत्तरखंड येथील एका बोगद्यात काम करत असताना अडकलेल्या कामगारांना येशस्वीरित्या बाहेर काढण्यात २ गाेमंतकीय मायनिंग इंजिनिअरचा सहभाग असल्याने ही गाेमंतकीयासाठी अभिमानाची बाब आहे. मायनिंग इंजिनिअर असलेले फोंडा येथील अमोघ गुडेकार आणि उसगाव येथील आसिफ मुल्ला यांचा यात सहभाग आहे.
गेल्या १२ नाेव्हेंबर राेजी बाेगद्याचे काम करत असताना अचानक ४१ कामगार या बोगद्यात अडकून पडले होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढणे ही राज्य सरकारची तसेच केंद्र सरकारची माेठी जबाबदारी होती. याकडे पूर्ण जगाचे लक्ष लागले होते. प्रधानमंत्री नरेंद्र माेदी या विषयी वेळोवेळी माहिती जाणून घेत होते. आमेरीकेकडून आधुनिक यंत्रे मागविली सर्व दलांचे सहकार्य घेण्यात आले. शेवटी १७ दिवसानंतर या कामगारांना यशस्वी बाहेर काढण्यात यश मिळाले. या कामगारांना बाहेर काढण्यात गोमंतकीय पुत्रांचाही हातभार असल्याने ही गोमंतकीयांसाठी माेठी अभिमानाची बाब ठरली आहे.
आसिफ मुल्ला आणि अमाेघ गुडेकार म्हणाले ही आमच्या जीवनातील मोठी संधी होती. आमच्या वरिष्टांनी आमच्यावर विश्वास ठेऊन या मिशनसाठी निवड केल्याने त्यांचे अगोदर आभार मानतो. आमचा या मिशनमध्ये सहभाग झाला हे आमच्यासाठी मोठे भाग्य आहे.