शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

स्वतः सह समाजाचा विकास करणारे शिक्षण घ्या; इस्रो प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांचे विद्यार्थ्यांना आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2024 12:14 PM

गोवा विद्यापीठाचा पदवीदान सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजीःगोवाविद्यापीठाने चांगले नागरिकही तयार केलेत, पण एवढ्यावर न थांबता, विद्यार्थ्यांना समाजातील विविध पैलूंशी सहज जोडू शकेल, असे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायला हवे. राज्यात हे एकच विद्यापीठ असल्याने त्यांना असे करणे सोपे आहे. विद्यार्थ्यांनीही अशा शिक्षणावर भर द्यावा, ज्यातून आपल्यासोबत समाजाचाही विकास होऊ शकेल, असे आवाहन भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी केले.

गोवा विद्यापीठाचा ३५वा पदवीदान सोहळा सोमवारी ताळगाव पठारावरील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर झाला. प्रमुख पाहुणे म्हणून सोमनाथ बोलत होते. त्यांच्यासोबत सन्मानीय पाहुणे म्हणून राज्यपाल तथा गोवा विद्यापीठाचे कुलपती पी.एस. श्रीधरन पिल्लई, कुलगुरू प्रा. हरीलाल मेनन, कुलसचिव (रजिस्ट्रार) व्ही.एस. नाडकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते.

आपल्याला आयुष्यात मोठे व्हायचे आहे, नाव कमावयचे आहे, तर केवळ एक-दोन गुण आत्मसात करून ते शक्य होणार नाही, यासाठी नेहमीच नवीन गोष्टी शिकण्यावर भर दिला पाहिजे. जरी एखादा विषय आवडला नाही, तरी त्या गोष्टीबद्दल आवड निर्माण करणे आवश्यक आहे. यातूनच आपण वेगळा विचार करू शकतो आणि आयुष्याच्या एका टप्प्यावर आपण अष्टपैलू होत जातो. त्यासाठी जिद्द आणि मेहनत करणे आवश्यक असते. नव्या लहान-मोठ्या जबाबदाऱ्या घेणे आवश्यक आहे, असे डॉ. सोमनाथ यांनी सांगितले. यावेळी राज्यपालांनी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले.

इस्रो प्रमुखांना डॉक्टरेट बहाल

डस्रो प्रमुख डॉ.एस. सोमनाथ त्यांच्या विज्ञान आणि अंतराळ या क्षेत्रातील महत्त्वाच्या कार्याची दखल घेत, त्यांना गोवा विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. त्यांना कुलपती आणि कुलगुरू यांच्या हस्ते विशेष स्मृतिचिन्हही भेट देण्यात आले.

'नवे अभ्यासक्रम सुरू'

गोवा विद्यापीठाने नावीन्यपूर्ण ध्येय ठेवून आतापर्यंत वाटचाल केली आहे. ही वाटचाल भविष्यातही ध्येय मिळेपर्यंत अशीच कायम राहणार आहे. यापूर्वी अनेक महत्त्वाच्या गोष्टी विद्यापीठाच्या विकासाच्या दृष्टीने केल्या आहेत. भविष्याचा विचार करून आणखी नव्या आधुनिक साधनसुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विद्यापीठात नवे अभ्यासक्रमही सुरू करणार आहोत, अशी माहिती गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरीलाल मेनन यांनी दिली.

पृथ्वी आणि विज्ञान विभागातर्फे गोवा विद्यापीठाला सुमारे १० कोटी रुपये देण्यात येणार आहे. या निधीतून आम्ही नव्या आवश्यक साधनसुविधा उभारणार आहोत. यंदा आम्ही पंतप्रधान उच्चतर शिक्षा अभियान (पीएम-उषा) योजनेसाठी पात्र ठरलो आहोत. या अंतर्गत मल्टी एज्युकेशनल अॅण्ड रिसर्च युनिव्हर्सिटीज (मेरू) उपयोजनेच्या साहाय्याने आम्ही नवीन अभ्यासक्रम सुरू करणार आहोत. ज्यामध्ये बीई इन बायोइंजिनिअरिंग आणि बायोमेडिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स, इंटिग्रेटेड एमएससी इन इकॉनॉमिक्स, इंटिग्रेटेड एमबीए, इंटिग्रेटेड एमएससी इन फिजिक्स आणि बायोलॉजी, बी. पी. एड आणि एम.पी. एड प्रोग्राम्स, संस्कृत आणि आयुर्वेदिक या विषयांचा समावेश आहे,असे मेनन यांनी सांगितले.

गोवा विद्यापीठाकडे चांगले उच्चशिक्षित आणि अनुभवी शिक्षक आहेत. त्यांचा विद्यार्थ्यांनी लाभ करून घ्यावा. आपल्या यशस्वी आयुष्यात पालक आणि चांगल्या शिक्षकांचा मोठा हातभार असतो. या गोष्ठी आता कळत नाहीत, पण भविष्यात जेव्हा तुम्ही मोठे व्हाल आणि मागे वळून पाहाल, तेव्हा या गोष्टींचे मोल कळेल, असेही डॉ. सोमनाथ म्हणाले.

गोवा विद्यापीठाचा सविस्तर प्रकल्प अहवाल वेळेआधीच सादर करण्यात आला आहे. त्यात नवीन पायाभूत सुविधांवर अनुदान खर्च कसा करण्यात आला, याबाबतही माहिती आहे. यामध्ये प्रामुख्याने स्कूल ऑफ अर्थ, ओशन अॅण्ड अॅटमॉस्फेरिक सायन्सेस, स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस (बायो- केमिस्ट्री इमारत), केमिकल सायन्सेस (फॅकल्टी रिसर्च लॅब्स, एफआरएल), फुटसल कोर्ट आणि तीन वसतिगृहे (मुली, मुले आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी), मनोहर पर्रीकर स्कूलच्या सभागृहाचे नूतनीकरण, आयसीपी एमएस, हायपर- स्पेक्ट्रल कॅमेरा, अॅटोमिक फोर्स मायक्रोस्कोप (एएफएम), फ्लोरेसेन्स ऍक्टिव्हेटेड सेल सॉर्टर यासारख्या प्रकल्पांचा समावेश आहे, अशी माहिती मेनन यांनी दिली.

 

टॅग्स :goaगोवाisroइस्रोuniversityविद्यापीठ