नारायण गावसपणजी : राज्यातील प्रसिद्ध असा मानकुराद आंबा गोवन बेबिंका, आगशीचे वांगे आणि सातशिरा भेंडी या चार वस्तूंना जीआय मानांकन प्राप्त झाले आहे. यामुळे गोव्यातील जीआय मानांकन प्राप्त वस्तूंची संख्या आता नऊवर पोहचली आहे.
नामांकन मिळालेल्या गोव्यातील प्रमुख वस्तूया अगाेदर राज्यातील खाेला मिरची, हरमल मिरची, काजू फेणी, मयंडोळी केळी आणि गोवन खाजे या पाच वस्तूंना जीआय मानांकन मिळालेले आहे. आता गोवन बेबिंका, मानकुराद, आगशीचे वांगे, सातशिरा भेंडीला जीआय मानांकन मिळल्याने आता एकूण वस्तूंची संख्या नऊ झाली आहे. मानकुराद आंबा, काजू फेणी, गाेवन खाजे, बेबिंका ही गोव्याची खास ओळख आहे. त्यात आता वेगवेगळ्या गोव्यातील भागात पिकविली जाणारी मिरची, वांगी, भेंडी याचा समावेश झाला आहे.
नारळाच्या करवंटीपासून बनविलेल्या वस्तूही नामांकनासाठी सादर करणारएखादे उत्पादन विशिष्ट भागातच घेतले जात असेल आणि त्या उत्पादनाला काही विशिष्ट ओळख असेल तर त्याला जीआय मानांकन दिले जाते. वरील सर्व उत्पादने ही गोव्याची विशिष्ट ओळख आहे. पेटंट डिझाइन आणि ट्रेडमाकच्या अधिकाऱ्यांनी डिंसेबरमध्ये जीआय नामांकनासाठी सादर केलेल्या वरील सर्व वस्तूंचे परीक्षण केले होते. नंतर विज्ञान-तंत्रज्ञान मंडळाकडून याचा अहवाल मागवला होता. त्यानुसार मंडळाने जीआय निबंधकांना अहवालही सादर केला होता. जीआय निबंधकांकडून मान्यता मिळाल्यानंतर हा अहवाल हरकतींसाठी १२० दिवस खुलाही ठेवण्यात आला होता. यात गोवन काजूही आहे पण हरकती १२० दिवस पूर्ण झाले नसल्याने काजूला जीआय नामांकन मिळाले नाही. तसेच आता नारळाच्या कट्टीपासून बनविलेल्या हस्तकलेच्या वस्तूंना नामांकनासाठी सादर केले जाणार आहे, अशी माहिती विज्ञान-तंत्रज्ञान मंडळाचे अधिकारी दीपक परब यांनी दिली.