पणजी : आमदार दिगंबर कामत यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेऊन कोंब येथे रेल्वे ओव्हरब्रीजला मंजुरी देण्याची मागणी केली.
कोंब येथील रेल्वे गेट बंद करण्याचा विचार चालू आहे. तसे झाल्यास तेथे ओव्हरब्रीज बांधावा लागले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्र्यालयाच्या माध्यमातून हा पूल बांधण्यासाठी कामत प्रयत्न करत आहेत. रिंग रोडला मंजुरी दिल्याबद्दल कामत यांनी त्यांचे आभार मानले. हे प्रकल्प काळाची गरज असून मडगांववासीयांनी त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे कामत म्हणाले.
कामत यांनी गडकरींचे पुन्हा केंद्रात मंत्री बनल्याने अभिनंदनही केले. कामत म्हणाले कि, लोकांच्या सहकार्याने मडगांव शहराचा कायापालट करण्यासाठी सरकार कटिबध्द आहे. मडगांव एक सर्व सोयींनी युक्त सुसज्ज शहर बनवण्याचे स्वप्न पूर्ण करु व एकत्रितपणे उज्ज्वल भविष्य घडवू , असे कामत यांनी म्हटले आहे.