पणजी: प्रो. डॉ गौरी आचार्य खून प्रकरणात पीडित गौरी आचार्य हिच्या केसमधून गौरीच्या वडिलांच्या वकिलाने माघार घेतल्यामुळे त्यांना सरकारने वकील द्यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने दिला आहे.
डॉ. गौरी आचार्य खून प्रकरणातील आरोपी गौरव बिद्रे ह्याने जामीनसाठी पुन्हा अर्ज केला असून सोमवारी त्याचा अर्ज सुनावणीसाठी आला तेव्हा त्याचे वकील एल पेडणेकर हे न्यायालयात अनुपस्थित होते. आजारामुळे न्यायालयात उपस्थित राहू शकत नसल्याची माहिती देऊन पुढील तारीख देण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली होती. त्यावेळी पीडीतेचे आई- बाबा न्यायालयात होते.
आपल्या वकिलाने आपली केस सोडली असल्याची माहिती गौरीच्या वडिलाकडून यावेळी न्यायालयाला दिली. त्यामुळे आपली केस लढविण्यासाठी वकील देण्याची मागणी त्यांनी न्यायालयाला केली. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी गौरीच्या वडिलांना उच्च न्यायालयाच्या कायदा सेवा प्राधिकरणाकडून वकील पुरविण्यास सांगितले. ही सुविधा गरीबांसाठी मोफत असते.
डॉ. गौरी ही खांडोळा येथील सरकारी महाविद्यालयातील प्राध्यापिका होती. जीम ट्रेनर असलेला गौरव प्रकाश बिद्रे याच्याशी तिची जीममध्ये ओळख झाली होती. त्यानंतर एकतर्फी प्रेमातून २३ जून २०२२ रोजी एकतर्फी प्रेमातून तिचा खून करण्याचा अघोरी प्रकार गौरवने केला. जुने गोवा पोलिसांनी या हत्येचा २४ तासात छडा लावला होता. जुने गोवे पोलिसांनी संशयित गौरव बिद्रे याच्या उपस्थितीत त्याने कदंब पठारावर झुडपात टाकून दिला होता.
गौरीचा खून हाताने गळा आवळून केल्याची कबुलीही त्याच्या कोठ़डीतील चौकशीच्यावेळी गौरवने दिली होती. तसेच गौरव हा हीन चारित्र्याचा असल्याचा आणि गौरी व्यतिरिक्त इतर अनेक युवतींशी लगट करण्याचा प्रयत्नही त्याने केला असल्याचे निवेदन यापूर्वी जुने गोवा पोलिसांनी न्यायालयात केले आहे. गौरीच्या खून प्रकरणात जुने गोवा पोलिसांनी गौरव विरुद्ध ३०३ पानी आरोपपत्रही दाखल केले आहे. गौरवने यापूर्वीही जामीनसाठी अर्ज केले होते, परंतु न्यायालयाने त्याचे अर्ज फेटाळले होते.