पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळात (गोमेकॉ) ऑक्सिजनचा तुटवडा कायम असून त्यामुळे रुग्णांचे जीव जाण्याचे सत्रही गुरुवारी सुरूच राहिले. गुरुवारी पहाटेच्या चार तासांत आणखी १५ कोविडग्रस्तांनी ऑक्सिजनअभावी अखेरचा श्वास घेतला.त्यामुळे उच्च न्यायालयाने इस्पितळ प्रशासनाच्या कारभाची लक्तरे काढली. ऑक्सिजनच्या अभावी होणारे लोकांचे मृत्यू आपण रोखू शकलो नाही, राज्य सरकारने अपेक्षाभंग केला अशी नाराजी न्यायालयाने व्यक्त केली. गोव्यातदिवसभरात सरकारी व खासगी इस्पितळांतमिळून ६४ हून अधिक कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला. एका ३५ वर्षीय महिला आयुर्वेदिक डॉक्टरचाही कोविडने जीव घेतला.रोज एक ऑक्सिजन टँकर -- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज ऑक्सिजनच्या पुरवठ्याविषयी चर्चा केली. गडकरी यांनी गोव्याला वैद्यकीय ऑक्सिजनचा एक टँकर रोज पाठविण्याचे ठरवले. - गडकरी यांनीच तशी घोषणा केली. हवाई दलाने गोव्यात ३२३ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स पोहचते केले.
गोव्यात ऑक्सिजनअभावी आणखी १५ रुग्ण दगावले, उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 6:06 AM