पणजी : गोव्यात गेल्या दोन महिन्यांच्या पर्यटन हंगाम काळात एकूण 212 चार्टर विमाने विदेशी पर्यटकांना घेऊन दाखल झालेली आहेत. गेल्यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या कालावधीत आलेल्या चार्टर विमानांची तुलना करता हे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हा पर्यटन हंगाम गोव्यासाठी आश्वासक ठरला आहे.
नव्या हंगामात चार्टर विमाने 1100 चा साकडं पार करतील, अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे मुरगाव बंदरात पर्यटकांना घेऊन मोठी जहाजे घेण्याचे सत्र चालूच आहे. सोमवारी एम् व्ही सेलेब्रिटी'हे जहाज तब्बल 2099 पर्यटकांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल झाले. या जहाजावर 937 कर्मचारी आहेत. 294 मीटर लांबीचे हे जहाज मुरगाव बंदरात ठेवताना. हे जहाज मोठे असल्याने 8.6 मीटर खोल समुद्र पातळीच्या ठिकाणी बंदरात ठेवण्यात आले. बंदराचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्यवस्था करण्यात आली. एवढे मोठे जहाज अलीकडच्या काळातच प्रथमच आल्याने मुरगाव बंदराच्या मानेत तो मानाचा तुरा मानला जातो.
चार्टर विमान विमानाबरोबरच स्वतंत्रपणे गोव्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या घोटी आहे त्यात भर म्हणून आता मोठी क्रुज जहाजेही गोव्यात हजारोंच्या संख्येने पर्यटकांना घेऊन दरवर्षी येत आहेत.
मुरगाव बंदरात या जहाजातून आलेल्या विदेशी पाहुण्यांनी पणजी शहर जुने गोवे येथील ऐतिहासिक सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च, पुरातन मंदिरे तसेच दक्षिण आणि उत्तर गोव्यातील किनाऱ्यांना भेट दिली. पाहुण्यांच्या स्वागतासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी व्हिसा क्लिअरन्सची सोय करून दिली. मुरगाव बंदरात या पर्यटन मोसमात आलेले हे सातवे मोठे क्रुज जहाज आहे. 2013- 14 या हंगामात गोव्यात एकूण 1126 चार्टर विमाने आली होती. त्या तुलनेत यंदाचा हंगाम चांगला जाईल, अशी आशा बाळगली जात आहे.
नाताळ, नववर्षानिमित्त राज्यात ठिकठिकाणी पार्ट्यांचा धुमधडाका चालला आहे. पुढील काळात विदेशी पर्यटकांची संख्याही गोव्यात मोठ्या संख्येने वाढणार आहे. यावर्षी मोठ्या पार्ट्यांचं आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या जाहिराती संकेतस्थळावर झळकत असून मोठ्या प्रमाणात बुकिंगही चालल्याचे दिसून येते. गोव्याला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांमध्ये रशियन पर्यटकांचा जास्त भरणा असतो. त्यापाठोपाठ युरोपमधील तसेच अन्य देशांचे पर्यटक नाताळ नववर्षासाठी गोव्यात गर्दी करत असतात.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात,दिल्ली आदी देशातील पर्यटक मोठ्या संख्येने या काळात गोव्यात असतात त्यामुळे हॉटेल्स फुल्ल झालेली आहेत. किनाऱ्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. राज्य सरकारने किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी खास बंदोबस्त केला आहे. समुद्रात उतरणाऱ्यांना बुडण्यापासून वाचवण्यासाठी मुंबईच्या दृष्टी लाइफ सेव्हिंग कंपनीच्या जीवरक्षकांची सेवा देण्यात येत आहे.