- पूजा नाईक प्रभूगावकरपणजी - कौंसिल ऑफ आर्किटेक्चर (सीओए) चा नोंदणी क्रमांक न मिळाल्याने गोवा आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी सलग दुसऱ्यादिवशी वर्गावर बहिष्कार घातला.
मागील दोन दिवसांपासून विद्यार्थी वर्गावर बहिष्कार घालत असले तरी त्याची अजूनही महाविद्यालयाने कुठलीही दखल घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.गोवा आर्किटेक्चर महाविद्यालयात २५० विद्यार्थी असून त्यापैकी ५० विद्यार्थ्यांना नोंदणी क्रमांकच नाही.
आर्किटेक्चर विद्यार्थ्याांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काम करण्यासाठी सीओएचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यासाठी सीओएकडे अर्ज करणे गरजेचे असून त्यासाठी विद्यार्थ्यांकडे नोंदणी क्रमांक गरजचा आहे. मात्र तो नसल्याने सर्व घोळ झाला आहे. गोवा आर्किटेक्चर महाविद्यालयाची क्षमता प्रती वर्ग ४० विद्यार्थी होती. त्यात वाढ करुन ५० करण्यात आली आहे. मात्र तसे महाविद्यालय प्रशासनाने सीओए ला कळवणे आवश्यक होते. परंतु त्यांनी न कळवल्याने सीओए ने केवळ ४० विद्यार्थ्यांनाच नोंदणी क्रमांक दिला आहे. नोंदणी क्रमांक नसलेले असे ५० विद्यार्थी असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले,